आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाच ठिकाणी अडकून पडलेला मान्सून आता ट्रॅकवर परतत आहे. हवामान विभागाने गुरुवारी सांगितले की, मान्सून पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल अशी शक्यता आहे. आयएमडीचे वैज्ञानिक आर. के. जनामणी यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकणार आहे.
औरंगाबादसह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात पाऊस
औरंगाबाद शहरात गुरुवारी सायंकाळी १५ मिनिटे पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले होते. नाशिक तसेच अहमदनगर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. चांदवड, सिन्नर, निफाड आणि नाशिक या तालुक्यांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. चांदवड तालुक्यात गारपीट झाली. सिन्नरमधील नायगाव, जायगाव, मोह, जाखोरी आणि मालेगाव तालुक्यातील अजंगवडे येथे वाऱ्याचा वेग अधिक होता.
मराठवाड्यात १० ते १३ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस
गोवा, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर,व रत्नागिरीच्या काही भागांत मान्सून ११ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. १० ते १३ जूनदरम्यान मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.