आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From October, Children Over The Age Of 12 Will Get The Corona Vaccine Across The Country

मुलांचे लसीकरण:ऑक्टोबरपासून 12 वर्षांवरील मुलांना देशभर मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली / पवनकुमार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. कोविड लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार अर्थात एनटागीचे चेअरमन प्रो. नरेंद्र अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लसीचे ३ ते ५ कोटी डोस मिळतील. या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. त्यानुसार तयारी केली जात आहे. अरोरा म्हणाले, पहिल्या टप्प्यात जर १ कोटी डोस आले तरी या टप्प्यात ३३ लाखांहून अधिक मुलांची नोंदणी केली जाऊ नये.

कारण, ज्यांना पहिला डोस दिला आहे त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा आणि ५६ व्या दिवसानंतर तिसरा डोस द्यावा लागेल. त्यादृष्टीने स्टॉक पाहून नोंदणी व्हायला हवी. देशात १२ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या १३ कोटी असून यात १% म्हणजे सुमारे सव्वा कोटी मुले गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांनाच धोका अधिक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना लस दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...