आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून देशात उसळलेली हिंसेची लाट अजूनही थंडावली नव्हती की लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेबाबत पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. देश आणि जगाच्या अशाच बातम्या 10 फोटोंमध्ये.
1. 'अग्निपथ' योजनेवरुन अनेक राज्यात विरोध पेटला
गेला आठवडा आंदोलनाच्या आगीत होरपळून निघाला. मोदी सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणासह देशातील 13 राज्यांमध्ये दंगली उसळल्या होत्या. 300 हून अधिक गाड्यांवर याचा परिणाम झाला. विरोधानंतर सरकारने अग्निवीरांची कमाल वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे केली आहे. मात्र, असे असूनही विरोधाचा वणवा थांबलेला नाही.
2. आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी सुरू
सदर फोटो अहमदाबादचा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी येथे सुरू झाली आहे. 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 75000 हून अधिक ठिकाणी सामूहिक योगासन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात योग दिनानिमित्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ७५ ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3. वक्तव्याचा निषेध : बांगलादेशातील भारतीय दूतावासासमोर निदर्शने
हा फोटो बांगलादेशातील ढाका येथील आहे, येथील इस्लामिक मूव्हमेंट बांगलादेश पक्षाच्या सदस्यांनी नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला. नुपूरने एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ढाका येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने करण्यात आली.
4. मोदींनी पुण्यात संत तुकाराम शिला मंदिराचे उद्घाटन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यातील संत तुकाराम शिला मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी मंदिर परिसरापासून काही अंतरावर आयोजित जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. यानंतर त्यांनी मुंबईत राजभवनातील जलभूषण भवन आणि क्रांती दालनाचे उद्घाटनही केले.
5. अमेरिका: 17 राज्यांमधील उष्णतेच्या लाटेचा 52 वर्षांचा विक्रम मोडला
दुष्काळ आणि जंगलात लागलेल्या आगीमुळे अमेरिका हैराण आहेच मात्र आता कडक उन्हामुळे लोकांची शांतताही हिरावून घेतली जात आहे. गुरुवारी, राष्ट्रीय हवामान सेवेने एक चेतावणी जारी केली की देशाच्या पश्चिम मध्य आणि दक्षिण मध्य भागात तीव्र उष्णता येऊ शकते. या उष्णतेच्या लाटेत सहा कोटी लोकसंख्या येण्याची शक्यता आहे.
6. जम्मू-काश्मीर: मैदानी प्रदेशात दरवळतोय लॅव्हेंडरचा वास
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये आजकाल लॅव्हेंडरचा वास येत आहे. श्रीनगरपासून डोंगराळ प्रदेशातील डोडा जिल्ह्यापर्यंतची शेते लॅव्हेंडरच्या फुलांनी भरलेली आहेत. सध्या घाटीत सुमारे 200 एकर जमिनीवर लॅव्हेंडरचे पीक घेतलेले आहे. 5000 हून अधिक शेतकरी येथे शेती करत आहेत.
7. चीनमधील प्राथमिक शाळेत दुपारची झोप अनिवार्य
हे चित्र चीनच्या हेबेई प्रांतातील आहे, जिथे प्राथमिक शाळांमध्ये दुपारी थोडा वेळ झोपणे बंधनकारक आहे. पूर्वीच्या विद्यार्थ्यांना डेस्कवर डोके ठेवून झोपावे लागत होते, परंतु आता तसे नाही. शाळा प्रशासनाने आता एक नवीन प्रकारची फोल्डेबल डेस्क-खुर्ची बनवली आहे, ज्यावर मुले दुपारची आरामदायी झोप घेऊ शकतात. त्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता वाढते, असे मानले जाते.
8. नासाच्या फ्युचर मून रॉकेटसह स्ट्रॉबेरी मूनचा फोटो
हा फोटो फ्लोरिडा (यूएसए) येथील केनेडी स्पेस सेंटरमधील आहे. हा फोटो गेल्या आठवड्यात पूर्ण चंद्रासमोर नासाच्या चंद्र रॉकेट आर्टेमिस 1 सोबत घेण्यात आला आहे. जूनच्या शेवटच्या पौर्णिमेला 'स्ट्रॉबेरी मून' असे म्हणतात कारण त्याचे स्वरूप जूनमध्ये पिकणाऱ्या स्ट्रॉबेरी या फळाशी जुळते.
9. अमेरिकेचा सर्वात वेगाने वाढणारा खेळ - पिकलबॉल
पिकलबॉल, बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस यांचे एकत्रित मिश्रण असलेला हा खेळ, 1965 मध्ये यूएसमध्ये टाइमपाससाठी पहिल्यांदा खेळण्यात आला होता. सुरुवातीला त्याची प्रसिद्धी कमी होती, परंतु कोरोनाच्या काळात त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. अमेरिकेत दरवर्षी याच्या एक हजार स्पर्धा होतात. मिनियापोलिसमधील एका क्लबमध्ये या खेळाचे सुमारे 9 हजार खेळाडू आहेत.
10. डेन्मार्क: आकाशात एकत्रितपणे 5 हजार पतंग
डेन्मार्कमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव संपन्न झाला. यावेळी आकाशात पाच हजारांहून अधिक पतंग पाहायला मिळाले. डेन्मार्क हा एक असा देश आहे जिथे कुटुंबांचा समावेश असलेल्या एक्टीव्हीटी होत असतात. उन्हाळा हा येथे पतंग उडवण्यासाठी उत्तम काळ मानला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.