आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:अयोध्येत आजपासून संघाचे शिबिर, भागवतांसह 500 प्रतिनिधी येणार

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अयोध्येचा विकास आणि राम मंदिर योजना सांगितली जाईल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय शारीरिक अभ्यास वर्गाचे ५ दिवसीय शिबिर अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये सोमवारपासून सुरू करत आहे.यामध्ये ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत २१ ऑक्टोबरला संबोधित करतील.

अयोध्येत शारीरिक प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनामागे संघाचा खास उद्देश आहे. या प्रतिनिधींना श्रीराम मंदिर बांधकामासह अयोध्येत होणारी विकासकामे, परिक्रमा मार्ग आदींची माहिती दिली जाईल. याआधी संघाने चित्रकूटमध्ये रणनीतिक मंथन केले. चार महिन्यांनंतर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे.मात्र, संघाच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने हा संघाचा नियमित कार्यक्रम असल्याचे सांगितले. भाजपशी संबंधित एका संघाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण देशाचे लक्ष पुढील चार महिन्यांनंतर यूपीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर आहे.

३७० कलम हटवण्याआधी ८०% फंड नेत्यांच्या खिशात जात होता : भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये सांगितले की, कलम ३७० हटवण्याआधी जम्मू-काश्मीरसाठी तरतूद केलेला ८०% निधी राजकीय नेत्यांच्या खिशात जात होता. आता खोऱ्यात सरकारी योजनांचा थेट लाभ मिळत आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राज्यात काय विकास झाला,अशी विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...