आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वंदे भारत मिशनच्या सातव्या टप्प्यात यूएईतून सर्वाधिक लाेकांना मायदेशी आणण्यात येणार आहे. गुरुवारपासून ही माेहीम सुरू हाेणार आहे. त्यात २७१ फ्लाइट्सचा समावेश असेल. याद्वारे सुमारे ४० हजारांहून जास्त लाेक परततील. त्याशिवाय आेमान, सिंगापूर, कतार, साैदी अरेबियाहूनदेखील माेठ्या संख्येने भारतीय परततील.
नागरी उड्डयन मंत्रालयाने आॅक्टाेबरचा कार्यक्रम निश्चित केला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ४९६ फ्लाइट्सची माेहीम विविध देशांत राबवली जाणार आहे. त्यात यूएईनंतर आेमानहून जास्त लाेक मायदेशी येतील. येथे एकूण १३ हजार लाेक परत येतील. सिंगापूर, कतार, साैदी अरेबिया, कुवेतहूनदेखील लाेक परत येणार आहेत. परदेशस्थ भारतीयांनी वंदे भारत मिशनसाठी आपली नाेंदणी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.