आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआय ट्रॅकिंग संशोधनावर एका बैठकीसठी जगभरातील प्रमुख न्यूरोलॉजिस्ट अमेरिकेच्या सिएटलमध्ये जमले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटासाठी यूजरचे लक्ष वेधून घेणाऱ्या उत्पादनांचे डिझाईन करणे या विषयावर ही तज्ञ मंडळी एकत्र आली होती. म्हणजेच न्यूरॉलॉजिक सायन्सवर आधारित नवा व्यवसाय कसा तयार करायचा? म्हणूनच मेटावर्ससारख्या व्हर्चअुल प्लॅटफॉर्मला वेसण घातले नाहीतर काय होईल? हे येथे जाणून घेऊया.
मेटावर्स काय करतोय? इंटरनेटहून मेटावर्समध्ये शिफ्ट होण्याच्या प्रक्रियेला आधी समजून घेतले पाहजिे. २-डी इंटरनेटचा अनुभव घेताना युजरला स्क्रिनवर काय आहे हे पाहता येते. ३-डीमध्ये ऑप्टिकल उपकरणाने यूजरला डिजिटल जगाचा अनुभव मिळतो. आता प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी फेसबुकने गेल्या वर्षी मेटावर्स उत्पादने व सेवांच्या विकासासाठी ७७ हजार कोटींची गुंतवणूक केली होती.
प्रायव्हसीवर परिणाम कसा? मेटावर्सने यूजर्सचा बायोमेट्रिक डेटा संकलित केल्यास त्याच्या यूजरची प्रायव्हसी एखाद्या खेळासारखी होईल. या डेटाच्या आधारे कंपनी यूजरच्या भावनांना ट्रॅक करू शकेल. ही ट्रॅकिंग क्लिक आणि कीस्ट्रोकपेक्षा उत्कृष्ट असेल. मेटाची ही इच्छा गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
युजरच्या डेटापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी काय केले जात आहे? मेटाच्या या योजनेमुळे जगभरातील सरकार चिंतेत पडले आहे. ते अशा प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आणणारे कायदे करण्याच्या कामाला लागले आहेत. कायद्यात कंपनीच्या व्यवहाराचे मापदंड काय असावेत, याबद्दल मत घेतले जात आहे. मेटासारख्या प्लॅटफॉर्मला वेसण घालण्याचा प्रयत्न आहे.
विद्यमान कायदा प्रभावी का नाही? डिजिटल जगातील मोठ्या कंपन्यांनी निगराणी ठेवण्याच्या सरकारच्या सर्व प्रयत्नांना वेळोवेळी निष्प्रभ केले आहे. अलीकडे मेटाचे ग्लोबल पॉलिसीचे अध्यक्ष निक क्लेग म्हणाले, नवीन मेटावर्स विकसित झाल्यानंतर मर्यादा ठरवणारे नियम तयार व्हायला हवेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.