आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fruits, Including Food, Became More Expensive In 30 Years, With Inflation Rising To 15.88% In May.

खाद्यपदार्थांसह फळे महागली:देशात ठोक महागाई 30 वर्षांत उच्चांकी पातळीवर, दर 15.88 टक्क्यांवर

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवणाखाण्याचे पदार्थ, फळे-भाज्या आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने ठोक महागाई दर (डब्ल्यूपीआय) १५.८८% च्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. हा ३० वर्षांत याचा सर्वात उच्च स्तर आहे. याआधी ठोक महागाई ऑगस्ट १९९१ मध्ये यापेक्षा(१६.०६%) होता. या वर्षी एप्रिलमध्ये दर १५.०८% आणि गेल्या वर्षी मेमध्ये १३.११% होता. हा एप्रिल २०२१ पासून सतत १४ व्या महिन्यात १०% वर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण निश्चित करताना किरकोळ महागाई दराच्या आकड्याला प्राधान्य देते. सोमवारी आलेल्या किरकोळ महागाईच्या आकड्यांत मेदरम्यान ही मासिक आधारावर ७.७९% वरून घटून ७.०४% नोंदली आहे. मात्र, ही सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्ट कक्षेच्या वर राहिली. घाऊक महागाई दर वाढल्याने प्रमुख व्याजदरांत आणखी वाढ होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

खाद्यपदार्थांची महागाई चार महिन्यांनंतर दुहेरी आकड्यांत
भाजी, बटाटे, गहू आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीतील वृद्धीमुळे खाद्यपदार्थांच्या महागाईने ४ महिन्यांनंतर दुहेरी आकडा ओलांडला आहे. मात्र, कांद्यात २०.४०% घसरण दिसली. खाद्यपदार्थांची महागाई मेमध्ये १२.३४% राहिली. ही एप्रिलमध्ये ८.३४% होती. दुसरीकडे एका वर्षात क्रूड ७९.५०% महाग झाले.

बातम्या आणखी आहेत...