आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fuel | Price | Govt | Central Government To Release 50 Million Barrels Of Crude Oil From Reserves, US Announces Release Of 50 Million Barrels Of Oil

इंधन वाढ:केंद्र सरकार राखीव तेलसाठ्यातून 50 लाख बॅरल क्रूड जारी करणार, अमेरिकेने 5 कोटी बॅरल तेल जारी करण्याची केली घोषणा

वृत्तसंस्था | नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्चे तेलाचे दर घटवण्यासाठी सरकार आपल्या धोरणात्मक तेलसाठ्यातून ५० लाख बॅरल तेल काढण्याची योजना आखत आहे. जगभरात कच्च्या तेलातील तेजीमुळे भारताने इतर मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत एकत्र येऊन आपल्या आपत्कालीन तेलसाठ्यातून क्रूड बाहेर काढण्याचे ठरवले आहे. अमेरिका ५ कोटी बॅरल तेल जारी करत आहे. तसेच जपान व इतरही देश आपल्या राखीव साठ्यातून तेल बाजारात आणत आहेत.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर धोरणात्मक राखीव तेलसाठे आहेत. त्यांची एकूण क्षमता सुमारे ३.८ कोटी बॅरल आहे. सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे कच्चे तेल मंगळुरू रिफायनरी व हिंदुस्तान पेट्रोलियमला विकले जाईल. ७-१० दिवसांत हे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.

जगभरात दर घटणार
अमेरिका ब्रिटन, जर्मनी, जपान व ऑस्ट्रेलियासह आयईएच्या २९ सदस्य देशांकडे राखीव तेल साठा आहे. ते ९० दिवसांच्या आयातीइतके तेलसाठा राखीव ठेवू शकतात. त्यांनी हे तेल बाजारात आणले तर जगभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल.

पेट्रोल अद्याप शंभरीतच
केंद्राने दिवाळीच्या आदल्या दिवशी पेट्रोल व डिझेलवर अबकारी शुल्क घटवले होते. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र आजही देशात पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९० रुपयांजवळ आहे.

बातम्या आणखी आहेत...