आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fuel Price Hike । Petrol Price Again, Government Fuel Companies Raised Petrol diesel Prices

इंधन महागाईचा भडका सुरुच:सलग दुसऱ्या दिवशीही इंधनवाढ, या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डीझेल 4.35 रुपयांनी महागला

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दररोज पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढत आहे. आज पुन्हा सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज दिल्लीत पेट्रोल-डीझेलच्या दरात 35-35 पैसे प्रतिलिटरची वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा नवीन दर हा 105.49 रुपये तर डीझेल 94.22 रुपये इतका झाला आहे.

या महिन्यात 13 वेळेस दरवाढ

ऑक्टोंबरच्या 16 तारखेपर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत सलग तेरा वेळेस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 3.85 रुपये तर डीझेल 4.35 रुपयांनी महाग झाली आहे. त्यात या वर्षाच्या सुरुवातीची तुलना जर आपण केली तर, 01 जानेवारी 2021 मध्ये पेट्रोल 83.97 रुपये तर डीझेल 74.12 रुपये प्रतिलिटर प्रमाणे मिळत होते. मात्र आता किंमती गगनाला भिडल्या असून, पेट्रोलने शंभरी पार करत 105.49 रुपये गाठले आहे. तर डीझेल देखील 94.22 रुपये झाला आहे. म्हणजेच केवळ 10 महिन्यातच पेट्रोल 21.52 तर डीझेल 21.10 रुपयांनी महागला आहे.

84 डॉलरच्या प्रति बॅरेलच्या पार कच्चे तेल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे. प्रति बॅरलसाठी आता 84 डॉलर मोजावे लागत आहे. याआधी देखील 2018 मध्ये कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. तेव्हा देखील प्रति बॅरलसाठी 84 डॉलर द्यावे लागत होते. आणि आता तीन वर्षानंतर देखील हीच स्थिती निर्माण झाली आहे.

या राज्यात पेट्रोल-डीझेल शंभरीच्या पार

देशातील 29 राज्यात पेट्रोल शंभरी पार केली आहे. त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दमन, छत्तीसगढ़, दिल्ली, जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपुर, नागालँड, पुडुच्चेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, ओडिसा, केरळ, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिजोरम, झारखंड, गोवा, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय आणि राजस्थानचा समावेश आहे.

तर डीझेलने देखील बहुतेक राज्यात शंभरी पार केली आहे त्यात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, उड़ीसा, तेलंगाना, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान आघाडीवर आहे.

बातम्या आणखी आहेत...