आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुल चौकसी बेपत्ता:मागील तीन दिवसांपासून PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसी बेपत्ता, पोलिस घेत आहेत शोध

अँटीगुआ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा आरोपी मेहुल चौकसी 2018 मध्ये भारतातून पळाला होता

पंजाब नेशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसी आता अँटीगुआ-बारबुडामधून बेपत्ता झाला आहे. तेथील माध्यमांनी सांगितल्यानुसार, पोलिस रविवारपासून चौकशीचा शोध घेत आहेत. चौकसी अखेरचा रविवारी सायंकाळी 5.15 वाजता त्याच्या कारमध्ये दिसला होता. पोलिसांना त्याची कार सापडली, पण चौकसी मिळाला नाही.

चौकसीने 2017 मध्ये अँटीगुआ-बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते

14,500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चौकसी जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळून गेला होता. नंतर समजले की, त्याने 2017 मध्येच अँटीगुआ-बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते. पीएनबी घोटाळ्याचा तपास करत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) आणि अमंलबजावनी संचालनालय (ED) सारख्या संस्था चौकसीच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्नात होते. त्याने अनेकदा तब्येतीचे कारण देऊन भारतात येण्यास नकार दिला होता. कधी-कधी व्हिडिो कॉन्फ्रर्सिंगद्वारे तो न्यायालयाच्या सुनावणीत हजर राहायचा.

या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि मेहुल चौकसीचा भाच्चा नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे. तेथील न्यायालयाने त्याला भारताच्या स्वाधिन करण्यास परवानगी दिली आहे. पण, नीरवने या निर्णयाविरोधात तेथील हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आता निर्णय येण्यासाठी 10 ते 12 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...