आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीचर आर्टिकल:या इवलूशा डोळ्यांनी अजून जग पाहिलेच नाही, कृपया हिला वाचवा!

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदिनीच्या मुलीने जन्म घेतला तेव्हापासूनच ती संघर्ष करत आहे. अवघ्या 9 महिन्यांची असताना ती वेदनेने विव्हळत आहे. काही महिन्यांची असतानाच तिच्या एका डोळ्याने काम करणे बंद केल्याचे कळाले. नंदिनीने तिला डॉक्टरांकडे नेल्यानंतर समोर आले की तिच्या डाव्या डोळ्यामध्ये रेटिनोब्लास्टोमा (डोळ्यांचा कर्करोग) आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळी उपचार नाही केल्यास हा आजार तिच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. ऑगस्ट महिन्यापासून तिची खूप काळजी घेतली जात आहे. त्यामुळे शरीरातील इतर कुठल्याही भागात त्याचा प्रसार झाला नाही.

अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे या मुलीचे आई-वडील उद्ध्वस्त झाले आहेत. नंदिनी सांगते, की अखेर एवढ्या चिमुकल्या मुलांना इतक्या वेदनेतून का जावे लागत असेल? गरीब आम्ही आहोत आणि त्याचा फटका आमच्या मुलीला बसत आहे. नंदिनीचे हे पहिलेच बाळ आहे. पण, दुर्दैवाने त्या बाळाला झालेल्या आजाराने पूर्ण कुटुंब हादरले आहे. मुलीच्या डाव्या डोळ्यावर आलेल्या पांढऱ्या डागाने या लोकांच्या आयुष्यात काळोख आणला आहे.

चिंतीत आई-वडिलांनी सुरुवातीपासून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न केले होते. पण, महामारीच्या काळात संक्रमणाच्या भीतीने ते असे करू शकले नाहीत. पण, आता तिच्या डोळ्यातील पांढऱ्या डागाचा आकार वाढत असल्याने त्यांनी त्वरीत निर्णय घेतला. डोळ्यांचे स्कॅनिंग केले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मुलीला रेटिनोब्लास्टोमा होता अर्थात तिच्या डाव्या डोळ्यात आक्रमक कर्करोग होता.

या मुलीच्या आई-वडिलांचे रोजचे आयुष्य एक दुःस्वप्न बनले आहे. यांचे छोटे आणि सुखी कुटुंब या घातक आजारामुळे नष्ट झाले आहे. नंदिनीच्या पतीने सांगितले, "माझ्या मुलीला जेव्हा-जेव्हा मी पाहतो तेव्हा माझे मन मोडल्या जाते. असे वाटते की मी एक चांगला बाप सिद्ध होऊ शकलो नाही. तिच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या माझ्या कानात ठणकत राहतात."

नुकतेच झालेल्या चाचण्यांच्या आधारे डॉक्टरांनी विश्वास व्यक्त केला आहे, की हा आजार 70 टक्क्यांपर्यंत पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी त्यांना लवकरात लवकर तिच्यावर कीमोथेरेपी सुरू करावी लागेल. पण, या उपचारासाठी 10 लाख रुपयांचा खर्च येईल असा अंदाज आहे. महामारीने एक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अंजलीच्या वडिलांच्या उत्पन्नाचे स्रोत आधीच कमी झाले. त्यामुळे, त्यांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे. व्याजावर कर्ज घेऊन आधीच या पालकांनी आपले दागिने गमावले आहेत. अशात नंदिनीच्या उपचाराच्या अपेक्षा धुसर होताना दिसत आहेत. या दुःखात मदत करेल असा कोणताही आधार त्यांना आता दिसत नाही.

प्रत्येक आई-वडिलांप्रमाणे आपल्या बाळाला खुशाल आणि निरोगी आयुष्य देणे हीच या दोघांची इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थितीने त्यांना आणखी संकटात ओढले आहे. हे कमकुवत आई-वडील आपल्या एकुलत्या एक मुलीला वाचवण्यासाठी तुमची मदत घेऊ इच्छित आहेत. आपले एक छोटेसे दान या तान्ह्या बाळाचे आयुष्य प्रकाशमान करू शकते. तिला जीवनदान देऊ शकते.

आताच दान करा.

बातम्या आणखी आहेत...