आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:सोनियांच्या श्वासनलिकेत फंगल इन्फेक्शन; राहुल गांधींची सोमवारी चौकशी

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या श्वासनलिकेच्या खालच्या भागात फंगल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांची तब्येत बिघडली होती. पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. दरम्यान, या घटनेमुळे नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सोमवारी चौकशी होईल. राहुल यांच्या आवाहनानंतर ईडीने चौकशी ३ दिवस पुढे ढकलली आहे. राहुल यांना गुरुवारच्या ब्रेकनंतर शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहायचे होते, पण सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी चौकशी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. आता ईडी राहुल यांना सोमवारी चौकशीसाठी येण्याबाबतचे नवे समन्स जारी करेल. ईडीने याच घटनेत सोनिया गांधींना मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, राहुल यांची ३ दिवसांत ३० तास चौकशी झाली आहे. ईडीचे अधिकारी राहुल यांच्या उत्तरामुळे समाधानी नसल्याचे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...