आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किस्से:वकील हजर न झाल्याने न्यायमूर्तींनी स्वत: फोनवर केली विचारणा; वकील म्हणाले, मी मथुरेत आहे...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत दिसली मजेशीर दृश्ये

(पवनकुमार)

लॉकडाऊनमुळे सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तांत्रिक अडचणींचा प्रकार सुरूच आहे. गुरुवारी एकानंतर एक असे अनेक प्रसंग घडले. एका प्रकरणात वकील हजर नव्हते. तेव्हा न्यायाधीशांनी त्यांना स्वत: फोन लावला. तेव्हा आपण मथुरेत असून ३१ मेनंतर दिल्लीत येणार असल्याचे वकिलांनी सांगितले. या प्रकरणात घडले असे की, न्यायालयासमोर दोन प्रकरणाच्या सुनावणीप्रसंगी वकीलच हजर झाले नाहीत. तेव्हा न्यायाधीश संजय किशन कौल यांनी स्वत: वकिलांना फोन केला. तेव्हा वकिलांनी म्हटले, आता आपण मथुरेत आहोत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची येथे साधने नाहीत. ही बाब त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितली. न्यायमूर्ती कौल म्हणाले, वकील ऑन रेकॉर्ड काही माहिती सांगत नाहीत. त्यानंतर वकिलांनी माफी मागत आपण समक्ष हजर राहून युक्तिवाद करू शकत नाही. यानंतर न्यायमूर्ती कौल यांनी आपण येथे कधी हजर राहाल? अशी विचारणा केली. तेव्हा वकिलांनी ३१ मेनंतर हजर राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी १ जूनपर्यंत पुढे ढकलली.

न्यायाधीश म्हणाले, छतावरील पंखा दिसतोय :

एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एका वकिलांनी कॅमेरा व्यवस्थित सेट केलेला नव्हता. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विचारणा केली, मी लॉर्ड, माझा आवाज ऐकू येतोय काय? यावर न्यायमूर्ती संजय कौल यांनी म्हटले, आम्हाला तुमचा आवाज ऐकू येतोय. पण चेहऱ्याऐवजी छतावरील पंखाच दिसतोय. त्यांच्या या उत्तरावर पीठावरील उपस्थितांत एकच हशा उसळला. न्या. काैल यांनी कॅमेरा अॅडजस्ट करण्यास सांगितले. वकिलांनी प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना यश मिळाले नाही. मी लॉर्ड, आपण आता दिसतो का? असे ते वारंवार विचारत होते. पण कधी वकिलांच्या घरातील छताचा पंखा दिसत होता, तर कधी भिंत दिसत होती. यामुळे चिंतेत सापडलेल्या वकिलांनी न्यायमूर्तींना फोन करून आपली अडचण सांगितली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.

कोणाचीही मदत न घेता फाइल शोधताना आमच्याकडून होतात चुका : न्यायमूर्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर व्हीसीद्वारे सुनावणी सुरू होती. त्यांनी एका सुनावणीचा क्रमांक येताच आम्ही ही याचिका फेटाळत असल्याचे म्हटले. यावर याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले, पाच सदस्यांच्या पीठाने माझ्या बाजूने निकाल दिला होता. न्यायमूर्तींना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी पुन्हा फाइल पाहिली. तेव्हा ते म्हणाले, आम्ही चुकून तुमच्या याचिकेची फाइल दुसऱ्याच याचिकेच्या फाइलमध्ये ठेवली होती. आम्ही कोणाची मदत न घेता फाइल शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा चुका होतात. आम्ही तुमच्या प्रकरणात नोटिसा जारी करत आहोत.

न्यायमूर्तींकडून वकिलांची विचारपूस

एका प्रकरणात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ हरीन रावल व्हीसीद्वारे हजर झाले. वकिलांनी आपण अशा तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करत असल्याचे सांगितले. मी लॉर्ड, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो काय? यावर न्या. संजय किशन कौल यांनी म्हटले, तुमचे ऐकूनही घेत आहोत आणि तुम्ही दिसतही आहात. आपली प्रकृती उत्तम असेल अशी आशा करतो.

या आडनावाचे लोक दक्षिण भारतीय

न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या एकल पीठासमोर एका प्रकरणात बाजू मांडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित वकिलास न्यायमूर्तींनी विचारले, तुम्ही कोणत्या गावाचे? तेव्हा वकिलांनी आपले नाव पी. सोमा सुंदरम असून आपण डेहराडूनचे असल्याचे म्हटले. तेव्हा न्या. रॉय म्हणाले, अशा आडनावाच्या व्यक्ती सहसा दक्षिण भारतातील असतात. मला वाटले तुम्ही तिकडचे आहात.

बातम्या आणखी आहेत...