आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिझर्व्ह बँक:व्याज दरात आणखी कपात केली जाण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेने दिले संकेत, शक्तिकांत दास म्हणाले - रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना या लवकर हटवल्या जाणार नाहीत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. सध्या अनलॉक सुरू झाले असले तरीही सुरुवातीच्या काळात जवळपास तीन महिने लॉकडाऊन होते. संपूर्ण देश घरात बसलेला होता. या काळात संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले आहेत.

अर्थव्यवस्था सध्या कोलमडलेली आहे. ही अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावं लागणार आहे. असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीनंतर अर्थ व्यवस्था पुन्हा एकदा मार्गावर आणणे गरजेचे आहे. असंही शक्तीकांत दास यांनी नमूद केलं.

याविषयी बोलताना शक्तीकांत म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना या लवकरच हटवल्या जाणार असं कोणीही समजू नये. तसेच बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीमध्ये आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं विलिनिकरण हे एक योग्य दिशेत उचलण्यात आलेलं असल्याचं पाऊल आहे असंही ते म्हणाले.

यासोबतच बँकांविषयी बोलताना ते म्हणाले की, बँकांना सध्याच्या स्थितीत आव्हांनांचा सामना करावा लागणार आहे. आता या आव्हानाचा सामना बँका कशा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार असल्याचं दास यांनी सांगितलं आहे.