आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताला पहिल्यांदाच जी-२० चे अध्यक्षपद मिळाले आणि शेर्पांची पहिली बैठक उदयपूरमध्ये ४ ते ७ डिसेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता देशाच्या ५० शहरांत १९८ बैठका होतील. त्या यशस्वी करण्याची जबाबदारी भारतीय शेर्पा अमिताभ कांत यांच्यावर आहे. भाास्करने जी-२० बाबत त्यांच्याशी विशेष चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आम्ही डिजिटल ट्रान्समिशन ऑफ इंडियाचे सादरीकरण केल्यावर अमेरिकेसह सर्व जी-२० देश आणि आमंत्रित देश चकित झाले. संपूर्ण बातचीत वाचा...
ग्लोबल अजेंड्यावर सहमती कठीण, मात्र आपल्याकडे आव्हाने संधीत बदलण्याची क्षमता {भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळाले आहे. आगामी एक वर्षांत भारताला कोणत्या रूपात पाहाल? सध्या जग अजेंडा तयार करत होते आणि भारत रिमार्क करत होता. सध्या भारत(पीएम नरेंद्र मोदी) अजेंडा तयार करतील आण जग नोंद घेईल. हा मोठा बदल आहे. भारताचे कथानक व्हॉइस ऑफ डेव्हलपिंग साऊथ होईल. राजस्थानसह संपूर्ण भारतात डिजिटल इंडियाला प्रोत्साहन मिळाले आहे. डिजिटल ट्रान्समिशन ऑफ इंडियाचे प्रझेंटेशन दिल्यावर जी-२० देशांसह आमंत्रित देशांतील लोक थक्क झाले. आता ते आपल्या येथे प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहेत. ते कृती आराखडा मागत आहेत. सर्वांनी पाहिले की, भारत कसा फार्मसी ऑफ वर्ल्ड तसेच कसा व्हॅक्सीन कँपेन ऑफ वर्ल्ड होऊन पुढे आला आहे.
{जी-२० चे लोक कमळावर प्रश्न उपस्थित करत आहेत? भाजप आपला प्रचार करत असल्याचे म्हटले जाते? मोबाइलमध्ये छायाचित्र दाखवत म्हणाले- हे पाहा, कमळ तर १९६८ मध्ये २० पैशाच्या नाण्यावरही हाेते. हे आधीपासून आले आहे. हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. ध्येय वाक्य- “वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ आहे. मात्र ब्रह्मांड एक आहे. मात्र, कोणी जन्माने युरोपीय, कोणी रशियन. भौगोलिक स्थिती भिन्न मात्र, विवधतेत एकता आहे. आम्ही यातून जात आहोत. ज्यांना हे कळत नाही ते लढत राहतील.
{भारताला जी-२०चा ग्लोबल अजेंडा तयार करायचा आहे, एकमत होईल? खूप कठिण काम आहे. मात्र, अशक्य नाही. युक्रेन-रशियाचे युद्ध आव्हान आहे. ग्लोब स्लो डाऊन आहे, जागतिक पुरवठा साखळी खंडीत आहे. कोविडनंतर अडचणी आहेत. तरीही भारताकडे ही आव्हाने संधीत रूपांतरीत करण्याची क्षमता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.