आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलगच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये परिवर्तनासाठी जी-२३ गटाची स्थापना झाली होती. परंतु पाच विधानसभेतील पराभवानंतर या गटाने रणनीती बदलली. धुरा आता कपिल सिब्बल यांच्या हाती नाही. जी-२३ च्या नव्या रणनीतीमध्ये गांधी परिवाराला बाजूला ठेवण्याच्या मागणीचा समावेश नाही. वरिष्ठ नेत्यांच्या या भावनेबद्दल भूपिंदर हुडा यांनी राहुल गांधींना अवगत केले. त्याविषयी सदस्य मणिशंकर अय्यर यांनी भास्करचे मुकेश कौशिक यांच्याशी केलेली ही चर्चा-
काँग्रेसच्या पराभवाचे कारण काय?
जी-२३ गट म्हटल्या जाणाऱ्या काँग्रेसमधील गटाचीही हीच मागणी आहे. पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठीच हा गट स्थापन झाला होता.
मग चूक कोठे झाली?
काँग्रेसचा ४९ पैकी ३९ निवडणुकीत पराभव झाला. कुठे ना कुठे तरी चूक झाली असेलच ना. त्याच्या तळापर्यंत जाण्याची मागणी करण्यात गैर काही नाही. म्हणूनच १६ मार्चच्या बैठकीला हजर होतो.
गांधी परिवाराला हटवून मार्ग निघेल?
जी-२३ मध्ये अशी धारणा आहे असे मला वाटत नाही. गांधी परिवाराला हटवण्याचा आम्हाला सल्ला दिला जातो. परंतु तसे केल्याने समस्या सुटत नाही, असा निष्कर्ष वरिष्ठ नेत्यांनी काढला आहे. आमचे लक्ष्य भाजपला पराभूत करणे आहे.
पक्ष उभा कसा राहील?
काँग्रेसचे संविधानच पक्षाला वाचवू शकते यावर आम्हा सर्वांचे एकमत आहे. ते आम्हाला विजयी करू शकते. काँग्रेसमध्ये तीन गोष्टींचा अभाव आहे. कार्य समितीची स्थापना नीटपणे व्हावी. तिकीटवाटप योग्य पद्धतीने व्हावे. पक्षात प्रत्येक पातळीवर निवडणूक व्हावी हा सर्वात मोठा मुद्दा आहे.
पक्ष त्या दिशेने वाटचाल करतोय का?
पक्षात तारखांची घोषणा झाली आहे. बूथ, पंचायत, जिल्हा व प्रदेश पातळीवर निवडणूक कार्यक्रम समोर आहे. यातून पक्ष बळकट होईल. आणखी दोन मुद्दे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या २० पैकी १० सदस्य निवडून येत होते. १९९७ मध्ये असे शेवटचे झाले होते. काँग्रेस अध्यक्षाला १० सदस्यांच्या नामांकनाचा अधिकार आहे. उर्वरित दहा सदस्य निवडून येणे अपेक्षित आहे. यातून पक्षाचे नेतृत्व उदयाला येईल. दुसरा प्रश्न संसदीय मंडळाचा आहे. पक्षात पूर्वी तिकीटवाटपाचा सर्वोच्च अधिकार सीपी बोर्डालाच होता.
मग गांधी परिवाराला बाजूला करण्याची गरज नाही?
मुळीच नाही. गांधी परिवाराची आम्हाला गरज आहे. आम्हाला सामूहिक, सर्वसमावेशी नेतृत्व हवे आहे. पक्ष, गांधी परिवार व नेतृत्व यातून बळकट होईल.
या गोष्टी गांधी परिवाराला कळवल्या का?
जी-२३ च्या भावनेबद्दल गांधी परिवाराला अवगत केले गेले आहे. आम्ही त्यांच्याविरोधात नाहीत. आमच्यामध्ये पाच माजी मुख्यमंत्री, सात माजी केंद्रीय मंत्री उपस्थित होते. आमच्यापैकी कोणीही काँग्रेसविरोधात षड्यंत्र करू शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.