आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाकडील तेल खरेदीवरून अमेरिकेच्या नेतृत्वातील जी-७ देशांनी लादलेले सर्व निर्बंध भारतासाठी कुचकामी ठरले आहेत. भारताने मार्चमध्ये रशियाकडून विक्रमी ५.७ कोटी बॅरल (दिवसाला १८ लाख बॅरल) तेल खरेदी केले. ही भारताच्या एकूण खरेदीच्या ३८% आहे. यासोबतच इराकला मागे टाकत रशिया भारताचा सर्वात मोठा वेगवान पुरवठादार बनला. आता पश्चिम आशियाई पुरवठादार इराक, सौदी अरेबिया व यूएईचा संयुक्त वाटा या वर्षी ४३% पर्यंत कमी झाला आहे. वस्तुत: भारताला रशियाचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा २०% स्वस्त मिळते. भारताला रशियन पुरवठा निर्बंधांच्या घोषणेनंतर वेगाने झाला, तर चीनने निर्बंधानंतर तेल पुरवठा घटवला.
भारताने २०२० मध्ये रशियाकडून केवळ २% कच्चे तेल खरेदी केले होते. मग युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी २०२१ मध्ये एकूण पुरवठा १६% झाला. युद्ध सुरू झाले व २०२२ मध्ये पुरवठा ३५% झाला. आता मार्चमध्ये भारताची खरेदी ३८% आहे.
जयशंकर स्पष्ट म्हणाले, आम्ही भारताचे हित पाहणार; युरोपीय देशांनी आधी रशियन पुरवठा कमी करावा, मग इतरांना सांगावे रशियाकडून तेल पुरवठा वाढवण्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारत-रशियातील संबंध तेल पुरवठ्यासह इतर क्षेत्रांमध्येही वेगाने मजबूत होत आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर बदललेल्या पाश्चात्त्य देशांच्या दृष्टिकोनावर जयशंकर म्हणाले, युरोपियन देश अजूनही आपल्या गरजेच्या एकूण ४०% क्रूड-गॅस रशियातूनच आयात करतात. म्हणून ते इतरांना जे सांगत आहेत, ते आधी स्वत:वर लागू करावे.
तज्ज्ञांचे मत : रशियन तेलाचा पुरवठा कमी होणे अशक्य, पण तो वाढू शकतो
सौदीचे थिंक टँक ‘कॅप्सार्क’ आणि अरामकोमधील माजी वरिष्ठ अधिकारी क्रूड बिझनेस तज्ज्ञ तिलक दोषी म्हणतात, ‘अलीकडच्या काळात रशियन निर्यातक व भारतीय कंपन्यांमध्ये नवे करार झाले. याचा थेट अर्थ म्हणजे भारत व रशियातील तेल व्यापार सध्या ज्या पातळीवर पोहोचला आहे त्यानुसार तो कमी होण्याची शक्यता नाही. मात्र, रशिया कमी किमतीत कच्चे तेल देत असल्यामुळे भविष्यात रशियन पुरवठा वाढू शकतो असे वाटते.
...मात्र पूर्ण फायदा नाही, कारण पेट्रोल-डिझेल स्वस्त नाही, पण महागाई थांबली
रशियाकडून २०% स्वस्त तेल खरेदीमुळे भारतीय कंपन्यांना फायदा झाला. मे २०२२ पासून आतापर्यंत त्यांची २९ हजार कोटींची बचत झाली. मात्र, कंपन्यांनी हा फायदा ग्राहकापर्यंत पोहोचू दिला नाही. दुसरीकडे जगभरात पेट्रोलच्या किमती वाढल्या, पण भारतात नाही. यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली. सरकारनेही कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले नाही. रिफायनर्सने रशियन तेलाची खरेदी वाढवून नुकसान भरून काढले.
भारताला ५०% पेक्षा जास्त पुरवठा, रशियाचे उद्दिष्ट... रशियन उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले, भारतासाठी क्रूड निर्यात २२ पटीने वाढली आहे. रशियन माध्यमांनुसार, रशियन कंपन्या भारताला पुढील दशकातील सर्वात मोठा खरेदीदार म्हणत आहेत. कमी दरात पुरवठा सुरू राहिला तर भारताची खरेदी ५० टक्क्यांवर जाईल असे त्यांना वाटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.