आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादानापूर छावणीच्या ट्रेनिंग एरियात जागोजाग लिहिलेले आहे.... प्रशिक्षणात गाळलेला घाम युद्धभूमीत रक्त वाचवतो. मात्र युद्धभूमीचा इतिहास साक्षी आहे की बिहार रेजिमेंटच्या जवानांनी घामच नव्हे, देशाच्या रक्षणासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब अर्पण केला आहे. त्याचे ताजे उदाहरण आहे गलवान खोरे. आजपासून ठीक एका वर्षापूर्वी १५ जून २०२० च्या संध्याकाळी रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैनिकांना अापल्या दुर्दम्य शौर्याने धूळ चारल्यानंतर हौतात्म्य पत्करले होते. गलवानच्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले, पैकी ११ बिहार रेजिमेंटचे होते.
गलवान खोऱ्यात सध्या एलएसीवर यथास्थिती कायम आहे. भारतीय लष्कर व चीनची पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) यांच्या चर्चा सुरू आहे. १५ जून २०२० ला चिनी सैनिकांशी चकमकीत सहकाऱ्यांच्या हौतात्म्यानंतरही भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावलेले आहे. अतिदुर्गम परिस्थितीतही जवान गस्त घालत २४ तास शत्रूंच्या हालचाली टिपतात. अधिकारी जवानांना आपल्या रेजिमेंटच्या वीरगाथा ऐकवतात.
१५ जून २०२० ला काय झाले होते : आश्वासन देऊनही मागे हटले नाहीत चिनी सैनिक, नि:शस्त्र भारतीय जवानांवर हल्ला
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेतील सहमतीनुसार, चिनी सैनिक लडाखच्या गलवान खोऱ्यातून आपल्या भागात परत जातील, असे गेल्या वर्षी ६ जूनला ठरले होते. १५ जूनपर्यंत पीएलएचे सैनिक मागे हटले नाहीत, त्यामुळे १६ बिहार बटालियनचे कर्नल संतोष बाबूंच्या नेतृत्वात एका नि:शस्त्र गस्ती पथकाने चिनी पथकासोबत सायंकाळी चर्चा आयोजित केली. चिनी सैनिकांनी जेव्हा मागे हटण्यास नकार दिला तेव्हा जोरदार चकमक उडाली आणि हाणामारी झाली. यादरम्यान अनेक भारतीय सैनिक नदीत पडले.
चिनी सैनिकांनी अचानक भारतीय सैनिकांवर हल्ला केला. त्यात कर्नल संतोष बाबू गंभीर जखमी झाले. भारतीय सैनिकांनी इतर जवानांना आघाडीवर सोडले आणि कर्नल बाबू आणि एका जखमी हवालदाराला तेथून घेऊन गेले. जे सैनिक आघाडीवर उरले होते त्यांनी प्रत्युत्तराच्या कारवाईत चीनच्या अनेक सैनिकांना जखमी केले. एका मेजरच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांचे एक युनिट पुन्हा चकमक झालेल्या ठिकाणी गेले आणि चिनी चौकीवर हल्ला करून चीनच्या अनेक सैनिकांना ठार मारले.
१७५८ मध्ये झाली होती रेजिमेंटची स्थापना...१८५७ च्या संग्रामापासून कारगिलपर्यंत शौर्यगाथा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.