आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Galwan Chronology: India China Ladakh Galwan Valley Face Off Border News Update | What Happened Between India And China In Galwan Valley

गलवान क्रोनोलॉजी:15 जूनच्या रात्री चीनच्या जवानानी भारतीय जवानांवर केला होता हल्ला, तेव्हापासून आतापर्यंत घडल्या या गोष्टी...

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीनमध्ये वादाला 5 मे रोजी सुरुवात झाली. उत्तर सिक्कीमच्या पेंगाँग त्सो सरोवराजवळ भारताने रस्त्याचे बांधकाम सुरू केले. या बांधकामाला चीनने विरोध केला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद उफाळून आला आणि हे प्रकरण लडाखपर्यंत पोहोचले. पूर्व लडाखमध्ये फिंगर एरिया आणि गलवान खोरे परिसरात चीनच्या सैनिकांनी कॅम्प लावले. भारताने त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, 15 जून रोजी चर्चेच्या फैऱ्या सुरू असताना सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचे सुद्धा 43 सैनिक मारले गेले. परंतु, चीनने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यात आता शुक्रवारी पहाटेच मोदी लडाखला पोहोचले आणि सैनिकांशी संवाद साधला. या प्रकरणात 15 जूनपासून आतापर्यंत काय-काय घडले याचा आढावा आम्ही घेतला आहे.

15 जून: सैनिकांमध्ये हिंसाचार

भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी कमांडर स्तरीय चर्चेत दोन्ही सैनिक मागे सरकण्यास तयार झाले होते. 15 जून रोजी कर्नल संतोष बाबू काही सैनिकांसोबत वादग्रस्त ठिकाणावरून चीनचे सैनिक परतले की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले. परंतु, त्या ठिकाणी अजुनही चीनचे सैनिक होते. बाबूंनी याला विरोध केला. याचवेळी चिनी सैनिकांनी पूर्वनियोजित कटातून भारतीय सैनिकांवर हल्ला सुरू केला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. यावर मोदींनी आपले जवान मारता-मारता शहीद झाले असे म्हटले होते.

17 जून : हवाई दल प्रमुख लेहमध्ये

हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया 17 जून रोजी लेह आणि 18 जून रोजी श्रीनगर एअरबेसवर पोहोचले. हे दोन्ही हवाई तळ लडाखपासून जवळ आहेत. येथे हवाई दल प्रमुख म्हणाले होते, की हवाई दल कुठल्याही परिस्थितीची सामना करण्यासाठी तयार आहे. एअरफोर्सने सुखोई-30 एमकेआय, मिराज 2000 आणि जग्वार फायटर एअरक्राफ्ट सुद्धा बेसवर तैनात केले होते. याच ठिकाणी अपाचे आणि चिनूक सुद्धा तैनात करण्यात आले होते.

18 जून: परराष्ट्र मंत्री पहिल्यांदा बोलले

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारावर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारतीय समकक्ष एस जयशंकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यानंतर जयशंकर म्हणाले, की गलवान खोऱ्यात जे काही घडले त्यासाठी चीन जबाबदार आहे. चीनचा हा पूर्वनियोजित कट होता. याच दिवशी दोन्ही देशांच्या मेजर जनरल स्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुद्धा झाली. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती आणि कन्नौर जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आला.

21 जून : धोरणात महत्वाचा बदल

लडाखमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने एक महत्वाचा आदेश जारी केला. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की फॉरवर्ड पोस्ट्सवर तैनात फील्ड कमांडर परिस्थितीनुसार आपल्या जवानांना शस्त्रांचा वापर करण्याची मंजुरी देऊ शकतात. भारत आणि चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या 2 किमी परिसरात शस्त्रांचा वापर करता येत नाही. त्यामुळे, हा निर्णय अतिशय महत्वाचा होता.

24 जून : लष्करप्रमुख लडाखला पोहोचले

भारतात बैठकांवर बैठका सुरूच होत्या. याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी लडाख दौरा केला. येथे त्यांनी जखमी भारतीय जवानांची भेट घेतली. तसेच फॉरवर्ड पोस्टवर तैनात तुकड्यांचा आढावा घेतला. यानंतर दिल्लीत परतले आणि त्याची माहिती संरक्षण मंत्र्यांना आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांना दिली. याच दिवशी सीडीएस जनरल रावत यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली.

26 जून : अमेरिकेचे विधान

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो म्हणाले, की भारत आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये चीनचा धोका आहे. त्यामुळे, अमेरिका आपले सैनिक हलवत आहे. युरोपातून मोठ्या संख्येने आमचे सैनिक आता आशियात तैनात केले जातील. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार यामागचे प्रमुख कारण होते. आम्ही युरोपात सैनिकांची संख्या कमी करत आहोत असेही पॉम्पियो म्हणाले होते. चीनने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

29 जून : जनरल व्हीके सिंह यांचा खुलासा

केंद्रीय मंत्री जनरल (निवृत्त) व्हीके सिंह यांनी गलवान येथे झालेल्या भारत-चीन सैनिकांच्या हिंसाचारावर एक खुलासा केला. ते म्हणाले, “हिंसाचाराचे कारण चिनी सैनिकांच्या टेंटमध्ये लागलेली आग होती. ही आग कशी लागली हे सांगणे कठीण आहे. ही घटना पॅट्रोलिंग पॉइंट 14 च्या आसपास घडली. 15 जूनच्या संध्याकाळी आपले सैनिक हे पाहण्यासाठी गेले होते की चिनी सैनिक परत गेले की नाही. त्याचवेळी भारतीय सैनिकांवर हल्ला झाला.”

30 जून : चीनच्या अॅप्सवर बंदी

भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी लावली. यात टिक टॉक, यूसी ब्राउजर, हॅलो आणि शेअर इट सारख्या अॅप्सचा समावेश आहे. या चिनी अॅपचे सर्व्हर भारतात नाहीत. यातून भारताचा डेटा चोरी केला जात आहे. यातून देशाच्या सुरक्षितता आणि एकतेला धोका आहे. त्यामुळेच, हे अॅप बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनने या निर्णयाला विरोध केला. तसेच आम्ही भारताच्या कुठल्याही गोष्टीवर बंदी लावणार नाही असे म्हटले होते.

02 जुलै : ग्लोबल टाइम्सचा दावा

चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सने दावा केला की भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यासाठी आपले वेग-वेगळ्या बॅचचे सैनिक कमी करणार आहेत. भारताने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...