आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Galwan Clashes| Martyr Colonal Santosh Singh Awarded Mahaveer Chakra, Four Others Awarded With Veer Chakra By President Ramnath Kovind

शहीदांना वीरचक्र:भारत-चीन सीमेवरील गलवान हल्ल्यात शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, 4 शहीदांना वीर चक्र देऊन गौरव

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना आज मरणोत्तर 'महावीर' चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. परमवीर चक्रानंतर हा दुसरा सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे. संतोष बाबू यांच्यासोबत ऑपरेशन 'स्नो लेपर्ड'मध्ये सहभागी असलेले नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार के. पिलानी, नाईक दीपक सिंग आणि शिपाई गुरतेज सिंग यांनाही मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. चीनसोबत झालेल्या या गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

4 पॅरा स्पेशल फोर्सचे सुभेदार संजीव कुमार यांनादेखील मरणोत्तर 'कीर्ती' चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला ठार आणि इतर दोघांना जखमी केल्याबद्दल त्यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले.

नायब सुभेदार नुदुराम सोरेन यांनादेखील मरणोत्तर 'वीर' चक्र प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात त्यांनी वीरतापूर्ण कारवाई केली होती. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

शिपाई गुरतेज सिंग यांनादेखील मरणोत्तर 'वीर' चक्र देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पालकांना हा पुरस्कार प्रदान केला. गेल्या वर्षी जूनमध्ये ऑपरेशन 'स्नो लेपर्ड'मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात वीरतापूर्ण कारवाईसाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...