आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने म्हटले, WHO ने घाईने निष्कर्ष काढला:भारतात बनलेले कफ सिरप जीवघेणे ठरवले होते; सरकार म्हणाले- क्वालिटी चांगलीच होती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात तयार झालेले खोकल्याचे औषध म्हणजेच कफ सिरप जीवघेणे असल्याच्या प्रकरणात सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर दिले आहे. भारताच्या औषध नियंत्रकांनी जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून म्हटले आहे की, गांबियात झालेल्या मृत्यूंचा संबंध भारतातील कफ सिरपशी जोडण्यात घाई करण्यात आली.

औषध नियंत्रकांनी म्हटले आहे की, मॅडेन फार्मास्युटिकल्समध्ये तयार झालेल्या ज्या 4 कफ सिरपचा उल्लेख होता, ते आम्ही सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. चारही उत्पादनांचा दर्जा सर्व निकषांवर चांगला ठरला. आमच्याकडे औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची निगराणी खूप गांभीर्याने केली जाते. आमच्याकडील उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी याची आम्ही काळजी घेतो.

गांबियातील 66 बालकांच्या मृत्यूचा संबंध जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार झालेल्या कफ सिरपशी जोडला होता. अशा 4 कफ सिरपविषयी अलर्टही जारी केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, फुफ्फुसांची स्थिती खालावल्याने बालकांचा मृत्यू झाला आहे. या सिरपच्या वापरानेच मृत्यू झाल्याची शक्यता अधिक असल्याचे संघटनेने म्हटले होते.

औषध नियंत्रकांनी डब्ल्यूएचओला पत्र लिहिले. त्यात म्हटले आहे की - तुम्ही गांबियातील मृत्यूंना भारतात बनवलेल्या कफ सिरपशी जोडण्याची घाई केली.
औषध नियंत्रकांनी डब्ल्यूएचओला पत्र लिहिले. त्यात म्हटले आहे की - तुम्ही गांबियातील मृत्यूंना भारतात बनवलेल्या कफ सिरपशी जोडण्याची घाई केली.

WHO ने भारतात तयार झालेल्या सिरपविषयी अलर्ट जारी केला होता

जागतिक आरोग्य संघटनेने 5 ऑक्टोबर रोजी भारतातील औषध निर्माण कंपन्यांत तयार झालेल्या 4 कफ सिरपबद्दल एक अलर्ट जारी केला होता. WHO ने म्हटले होते की ही उत्पादने दर्जात्मक मानके पूर्ण करत नाहीत. ते सुरक्षित नाही. विशेषतः याच्या वापराने बालकांना गंभीर समस्या किंवा मृत्यूचा धोका आहे.

WHO ने आपल्या अहवालात पुढे म्हटले होते की, कफ-सिरपमध्ये डायथेलेन ग्लायकोल आणि इथिलेन ग्लायकोलचे जितके प्रमाण आहे त्यामुळे ते मानवासाठी घातक ठरू शकते. या कंपाऊंडमुळे भारतातही बालकांसह 33 जणांचा मृत्यू झाला आहे. पण या कंपाऊंडवर बंदी आणण्यात आली नाही.

चारही कफ सिरप भारतात विकले जात नाहीत. कंपनी फक्त त्यांची निर्यात करते.
चारही कफ सिरप भारतात विकले जात नाहीत. कंपनी फक्त त्यांची निर्यात करते.

WHO ने वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. हा केवळ गांबियासारख्या देशांसाठीच नव्हे तर भारतासाठीही गंभीर आहे. बालकांशी निगडित प्रकरण असल्याने ते अधिक व्यापक होते. अनेक प्रश्न आहेत... WHO चा सविस्तर अहवाल, ज्या भारतीय कंपनीत याचे उत्पादन झाले. हे सिरप भारतातही विकले जात आहे का? हे खरेच धोकादायक आहे का?

मेडन फार्माला सरकारने क्लीन चिट दिली

गांबियात 66 बालकांच्या मृत्यूच्या प्रकरणात सरकारने कंपनीला क्लीन चिट दिली आहे. केंद्र सरकारने म्हटले की, मेडन फार्माचे सिरप योग्य दर्जाचे आहे. यात कोणतीही भेसळ आढळली नाही. सरकारने राज्यसभेत याची माहिती दिली.

गांबियाने म्हटले - मृत्यूची माहिती अजून स्पष्ट नाही

गांबिया वैद्यकीय नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी टीझन जेलोंनी 31 ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेत म्हटले की, 'अजून याची पुष्टी झाली नाही की, भारतीय खोकल्याच्या औषधाने बालकांचे मूत्राशय खराब झाले होते. आम्ही बालकांच्या मृत्यूमागील कारण शोधत आहोत. अजून तरी इतकीच माहिती आहे की खोकल्याच्या औषधाने बालकांचा मृत्यू झाला होता.'

हा फोटो गांबियाच्या आरोग्य केंद्रातील आहे. गांबिया मेडिसिन्स कंट्रोल एजन्सीच्या प्रतिनिधीने सांगितले की, आतापर्यंत हे ज्ञात आहे की मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाला आहे.
हा फोटो गांबियाच्या आरोग्य केंद्रातील आहे. गांबिया मेडिसिन्स कंट्रोल एजन्सीच्या प्रतिनिधीने सांगितले की, आतापर्यंत हे ज्ञात आहे की मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाला आहे.

गांबियात कफ सिरपच्या ज्या कंपाऊंडने 66 बालकांचा मृत्यू झाला, त्याने भारतातही 33 जणांचा मृत्यू

diethylene glycol आणि ethylene glycol या कंपाऊंड औषधांच्या वापरास अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये बंदी आहे. मात्र भारतात दोन वेळा या कंपाऊंडमुळे संकटे आली आहेत.

1986: मुंबईत 21 रुग्णांचा मृत्यू

1986 मध्ये मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान अनेक रुग्णांना ग्लिसरीन देण्यात आले होते. यानंतर मूत्राशय निकामी झाल्याने 21 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तपासात निष्पन्न झाले की त्यांना दिलेल्या ग्लिसरीनमध्ये diethylene glycol मिसळले होते.

2020: जम्मू-काश्मिरात 12 बालकांचा कफ सिरपने मृत्यू

2020 मध्ये चंदीगड पीजीआयच्या डॉक्टर्सनी औषध नियंत्रकांकडे कोल्डबेस्ट या कफ सिरपची तक्रार केली. या कफ सिरपच्या वापराने जम्मू-काश्मीरच्या उधमनगरमधील 12 बालकांचा मृत्यू झाला होता. या कफ सिरपमध्येही diethylene glycol होते.

बातम्या आणखी आहेत...