आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Game Changer Anti Corona Drug 2 DG Of DRDO All That You 2 DG Know, 2 Deoxy D Glucose, DGCI Approves For Emergency Use Against COVID 19

गेम चेंजर औषध:व्हायरसची ऊर्जाच नष्ट करते DRDO चे हे औषध; जाणून घ्या भारतात कधी येणार आणि काय असेल याची किंमत? प्रश्नोत्तरांमध्ये जाणून घ्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचे नवीन औषध 2-DG या चार गोष्टींमध्ये देशातील स्थिती बरीच सुधारु शकते

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेल्या देशाला उपचारात नवी ऊर्जा देणाऱ्या DRDO च्या नवीन औषध 2-DG (2-deoxy-D-glucose) ला गेम-चेंजर म्हटले जात आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ची तत्काळ मंजूरी मिळाल्यानंतर प्रश्न विचारले जात आहेत की, अखेर या औषधामध्ये काय विशेषता आहे?

कोरोनाविरोधातील लढाईत भारत चार मोठ्या मुद्द्यांवर कमी पडत आहे
पहिला - रुग्णालयात बेडची कमतरता, दुसरा - ऑक्सिजनची कमरता, तिसरा - रेमडेसिवीर सारख्या औषधांची कमतरता आणि चौथे - औषध किंवा व्हॅक्सीनच्या कच्च्या मालासाठी विदेशांवर अवलंबून असणे.

कोरोनाचे नवीन औषध 2-DG या चार गोष्टींमध्ये देशातील स्थिती बरीच सुधारु शकते
स्वतः DRDO चे म्हणणे आहे की, या औषधाने रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबून असणे कमी होईल. यासोबतच त्यांना बरे होण्यास 2-3 दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल म्हणजेच रुग्णालयातून रुग्णांना लवकर सुट्टी होईल.

चला तर मग जाणून घेऊया फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसह तयार DRDO चे हे औषध कशी आपल्याला कोरोनाविरोधात जिंकवू शकते.

Q. कोरोना विरोधातील कमकुवत होत असलेल्या भारताच्या लढाईमध्ये DRDO च्या औषधाला गेम चेंजर का म्हटले जात आहे?

A. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल दरम्यान ज्या रुग्णांना ठरलेल्या औषधांसह DRDO चे औषध 2-deoxy-D-glucose (2-DG) देण्यात आले, तिसऱ्या दिवशी त्यामधून 42% रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली नाही.

तर ज्या रुग्णांना उपचारांच्या योग्य मानक, म्हणजेच स्टँडर्ड ऑफ केअर (SoC) नुसार औषध देण्यात आले, त्यांच्यामध्ये हा आकडा 31% होता.

तसेच ज्या रुग्णांना 2-DG औषध देण्यात आले त्यांच्या vital signs, म्हणजेच हृदयाचे ठोके (पल्स रेट), ब्लड प्रेशर, ताप आणि श्वास घेण्याच दर, इतर रुग्णांच्या तुलनेत जवळपास 2.5 दिवसांपूर्वीच सामान्य झाला.

- औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या लक्षणांमध्ये झपाट्याने घट झाली. स्पष्ट आहे की, अशा रुग्णांना रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज पडणार नाही. - 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोरोना रुग्णांनाही हेच परीणाम मिळाले. - या परिणांवरुनच DRDO च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, या औषधामुळे केवळ ऑक्सिजनवर अवलंबून राहणे कमी होणार नाही तर रूग्णालयात बेडची कमतरताही दूर करता येऊ शकेल. - यामुळेच 2-DG ला गेम चेंजर म्हटले जात आहे.

Q.कोरोनाचे हे औषध कसे काम करते? याचे वैशिष्ट्य काय?
DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड एनाइट सायंसेज (INMAS) च्या लॅबोरेटरीजमध्ये तयार हे औषध ग्लूकोजचेच एक सब्स्टिट्यूट आहे. हे संरचनात्मकरित्या ग्लूकोज प्रमाणे आहे, मात्र यापेक्षा वेगळे आहे. हे पावडरच्या स्वरुपात आहे आणि पाण्यात मिसळून रुग्णांना दिले जाते. कोरोना व्हायरस हे आपल्या एनर्जीसाठी रुग्णांच्या शरीरातून ग्लूकोज घेऊन टाकतात. तर हे औषध केवळ संक्रमित कोशिकांमध्ये जमा होते. कोरोना व्हायरस ग्लूकोज समजून या औषधाचा वापर करु लागतात. अशा प्रकारे व्हायरसला एनर्जी मिळणे बंद होते आणि त्यांचे व्हायरल सिंथेसिस बंद होते. म्हणजेच नवीन व्हायरस तयार होणे बंद होते आणि इतर व्हायरसही मरुन जातात. खरेतर हे औषध कँसरच्या उपचारांसाठी तयार केले जात होते. कारण हे केवळ संक्रमित कोशिकांमध्ये भरते. याच्या या गुणामुळे केवळ कँसर-ग्रस्त कोशिकांना मारण्याचा विचार करुन हे औषध तयार केले जात होते. या औषधाचा वापर कँसर-ग्रस्त कोशिकांना अचूक कीमोथेरेपी देण्यासाठीही करण्याची तयारी आहे.

Q. हे औषध कसे आणि किती प्रमाणात घेतले जावे?
सामान्य ग्लूकोजप्रमाणे, हे औषध पाउचमध्ये पावडरच्या स्वरूपात मिळेल. ते पाण्यात मिसळा आणि रुग्णांना प्यायला द्यावे. औषधाचा डोस आणि वेळ रुग्णाचे वय, वैद्यकीय स्थिती इत्यादींचे परीक्षण करून डॉक्टरांकडून दिले जाईल. कोरोना टाळण्याच्या नावाखाली किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध न घेण्याचा इशाराही डीआरडीओ वैज्ञानिकांनी दिला आहे.

Q.औषधाची किंमत किती असेल?
औषधांच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. DRDO चे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर चंदना म्हणतात की औषधाची किंमत उत्पादनाची पध्दत व प्रमाण यावर अवलंबून असेल. या सर्व प्रकल्पाचे औद्योगिक भागीदार डॉ. रेड्डीज लॅबला हे सर्व ठरवायचे आहे. लवकरच किंमत देखील उघड होईल. असे मानले जाते की औषध जेनेरिक रेणूपासून बनवलेले आहे, म्हणून ते महाग असणार नाही. दुसरीकडे, औषधांचा पाउच 500 ते 600 रुपयांपर्यंत असू शकतो, असा दावा सूत्रांकडून केला जात आहे. सरकार यात काही अनुदानाची घोषणा देखील करू शकते असेही मानले जात आहे.

Q.देशात आता रोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत, हे औषध गरजेनुसार उपलब्ध होऊ शकेल?
कोरोनाचे हे औषध 2-डीजी जेनेरिक रेणूपासून बनवलेले आहे जे जेनेरिक आहे. म्हणजेच, कंपनीने त्याच्या मूळ रसायनावर कायदेशीररित्या विकसित केलेल्या पेटंटची मुदत संपली आहे. जेनेरिक औषधांमध्ये ब्रँडेड पॅरेंट ड्रगसारखे सर्व गुणधर्म असतात, त्याचे पॅकेजिंग, बनविणे प्रक्रिया, रंग, चव इत्यादी भिन्न असू शकतात. बर्‍याच देशांमध्ये मूळ औषध विकसित करणार्‍या कंपनीला 20 वर्षांसाठी पेटंट मिळते. म्हणजेच, या काळात कोणीही त्या कंपनीच्या परवान्याशिवाय औषध बनवू शकत नाही. त्या बदल्यात त्यांना औषध विकसित करण्यात खर्च करणार्‍या कंपनीला एक मोठी रक्कम द्यावी लागेल. जेनेरिक असल्याने, हे औषध कमी किंमतीत भरपूर प्रमाणात बनवता येते.

Q.2-DG औषध बनवण्याचा कच्चा माल भारतात उपलब्ध आहे की, ते इंपोर्ट करावे लागेल?
हे औषध ग्लूकोज ऐनेलॉग आहे, म्हणजेच हे असे ग्लूकोज आहे जे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या ग्लूकोजप्रमाणे आहे, मात्र त्याला सिंथेटिक पध्दतीने बनवले जाते. याचे उत्पादन करणेही सोपे आहे. DRDO मध्ये या प्रोजेक्टचे डायरेक्टर डॉ. सुधीर चंदाना यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, कच्चा माल उपलब्ध होण्यात कोणतीही अडचण नाही. माहितीनुसार या औषधाला व्यावसायिक रित्या बनवणाऱ्या डॉ. रेड्डीज लॅबजवळ पुरेसा कच्चा माल आहे.

Q. औषध बाजारात कधी मिळून सुरू होईल?
DRDO ने या प्रोजेक्टमध्ये डॉ. रेड्डीज लॅबला आपले इंडस्ट्रियल पार्टनर बनवले आहे. DRDO चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर यांचे म्हणणे आहे की, DRDO डॉ. रेड्डीज लॅबसह तेजीने उत्पादनाचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा दावा आहे की, काही दिवसांच्या आत हे औषध बाजारात येऊ शकते. सुरुवातीला 10 हजार डोस उतरवले जाऊ शकतात. तर DRDO च्या सोर्सेसनुसार देशात त्यांचे जवळपास अर्धा डजन रुग्णालयांमध्ये 11-12 मेपासून हे औषध रुग्णांना दिले जाईल.

Q. औषध गंभीर रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?
प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सुधीर चंदाना यांच्यानुसार 2-DG चे ट्रायल सौम्य, मध्यम आणि गंभीर तिन्हीही प्रकारचे लक्षण असणाऱ्या रुग्णांवर करण्यात आले होते. सर्व प्रकारच्या रुग्णांना यामुळे फायदा झाला आणि कोणत्याही प्रकारचे गंभीर साइड इफेक्ट्स दिसले नाहीत. यामुळे हे एक सुरक्षित औषध आहे. दुसऱ्या टप्प्याच्या ट्रायलमध्ये रुग्ण ठिक होण्याचा दर खूप चांगला होता आणि तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलमध्ये रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून असणे कमी झाले.

बातम्या आणखी आहेत...