आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gamers Will Be The Satellite Guided Missile Of Himars; Russia Is Upset Over The Missile System Provided By The US To Ukraine, Targeting Up To 80 Km

दिव्‍य मराठी एक्‍सप्‍लेनर:हिमार्सचे सॅटेलाइट गायडेड मिसाइल ठरणार गेमचेंजर; 80 किमीपर्यंतचे लक्ष्य, अमेरिकेने युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे रशिया नाराज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेने रशियाविरुद्ध युक्रेनला अत्याधुनिक हाय मोबिलिटी आर्टिलरी राॅकेट सिस्टिम (हिमार्स) देण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांच्या म्हणण्यानुसार युक्रेनच्या पूर्वेकडील डाेनबासमध्ये रशियन हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हिमार्स प्रभावी ठरतील. परंतु हिमार्स देण्यास रशियाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रशियाचा थेट अमेरिकेशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. या हिमार्सविषयी जाणून घेऊया.

-हिमार्स इतर राॅकेट प्रणालीपेक्षा वेगळे कसे?
हिमार्स अत्याधुनिक राॅकेट प्रणाली आहे. उपग्रहाच्या सूचनेनुसार क्षेपणास्त्र डागले जाते. त्यामुळे अचूक लक्ष्यभेद होताे. सध्या रशिया व युक्रेन मल्टिपल लाँचर राॅकेटचा वापर करतात. हिमार्स एमएलआरएस रेंज व अचूकतेच्या बाबतीत उत्कृष्ट मानले जाते. ते एका वेळी अनेक क्षेपणास्त्रही डागते.

-अमेरिका युक्रेनला कोणती प्रणाली देणार आहे?
अमेरिका एम१४२ हिमार्स राॅकेट प्रणाली देणार आहे. हे १९७० च्या ट्रक माउंडेड एमएलआरएसचे अॅडव्हान्स व्हर्जन आहे. याद्वारे २२७ एमएमचे ६ क्षेपणास्त्र डागता येतात. हिमार्स चालवण्यासाठी ४ सैनिकांची गरज भासते. क्षेपणास्त्र डागण्यासाठी दाेन मिनिटांहून कमी कालावधी लागताे. युक्रेनमध्ये सध्या असलेल्या प्रणालीस क्षेपणास्त्र डागण्यास पाच िमनिटांचा वेळ लागताे.

-युक्रेनसाठी हे कसे उपयुक्त ठरू शकते?
रशियन सैन्य पूर्व आणि दक्षिणेकडील भागात आगेकूच करत आहे. हिमार्स आल्यानंतर युक्रेनकडे या भागात रशियाचा चांगल्या प्रकारे सामना करण्याचे बळ येईल. अमेरिकेकडून अलीकडेच युक्रेनला एम ७७७ होवित्झर ताेफा मिळाल्या होत्या. त्यांच्या तुलनेत यांची मारक क्षमता दुपटीवर आहे. हे शस्त्र रशियाचे मोठे नुकसान करू शकते.

-अमेरिकेने एमजीएम-१४० का दिले नाही?
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनला हिमार्स देण्याचे जाहीर केले, परंतु ३०५ किमी रेंज असलेल्या एमजीएम-१४० मिलिट्री टॅक्टिकल मिसाइल सिस्टिम दिली नाही. खरे तर युक्रेनने याच प्रणालीची मागणी केली होती. लांब पल्ल्याची व्यवस्था असल्यास रशियाची घुसखाेरी रोखता येईल, असे युक्रेनला वाटत होते.

बातम्या आणखी आहेत...