आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविडच्या दुसऱ्या लाटेचा धक्का झेलणाऱ्या देशातील वाहन कंपन्यांना गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामापासून मोठ्या अपेक्षा आहेत. कंपन्यांच्या अंदाजानुसार, या सणात गाड्यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या ओणम सणातील चांगल्या विक्रीनेही वाहन कंपन्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. टाटा माेटर्सचे अध्यक्ष(प्रवासी वाहन) शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, बाजार खुला झाला आहे, यामुळे दुसऱ्या लाटेनंतर सुधारणा बरीच चांगली राहिली. आम्ही या सणात अनेक नव्या गाड्या लाँच करत आहोत. डार्क एडिशन आणि टियागो एनआरजीची लाँचिंग करत आहे. डार्क एडिशन आणि टियागो एनआरजीच्या लाँचिंगसह आम्ही फेस्टिव्ह सीझनची सुरुवात केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, ग्राहक मागणीच्या हिशेबाने सणात चांगली सुधारणा राहील. मारुती सुझुकीचे मार्केटिंग हेड शशांक श्रीवास्तव म्हणाले, ओणमदरम्यानच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांहून जास्त विक्री दिसली. गणेश चतुर्थीमध्येही कंपनी अशीच अपेक्षा करत आहे. ऑटो डीलर्स असोसिएशन फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, या सणासुदीत आम्ही वार्षिक आधारावर विक्रीत १०-१५ टक्के वाढीची अपेक्षा करत आहोत.
ऑगस्टमध्ये कारची विक्री ३९% वाढून २,५३,३६३ वाहने झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १,८२,६५१ कारची विक्री होती. फाडानुसार, गेल्या महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री ७% वाढून ९,७६,०५१ युनिट झाली. व्यावसायिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ९८% वाढून ५३,१५० युनिटच्या पातळीवर पोहोचली. याच्या तुलनेत २०२० मध्ये २६,८५१ व्यावसायिक वाहने विकली होती. गेल्या महिन्यात १३,८४,७११ वाहने विकली व या प्रकरणात १४% वाढ नोंदली.
या वेळी सणाची तयारी वेगळी
आम्हाला अपेक्षा आहे, की महाराष्ट्र विशेषत: मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही या वर्षी गणेश चतुर्थीचा सण वाहन रिटेलर्ससाठी चांगला राहील. प्रवासी वाहनांची मागणी चांगली आहे. मात्र, पुरवठ्याचे आव्हान कायम आहे.- विंकेश गुलाटी, अध्यक्ष, फाडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.