आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीबीआयने १०० कोटी रुपये घेऊन राज्यसभेची जागा देण्याचे आणि राज्यपाल करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. अनेक राज्यांत पसरलेल्या या रॅकेटच्या गुंडांना पैशांच्या देवाणघेवाणीआधी पकडण्यात आले. सीबीआयने अलीकडेच अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अटक करण्यात आलेल्यांत महाराष्ट्राचा कमलाकर प्रेमकुमार, कर्नाटकचा रवींद्र नाईक, दिल्लीचा महेंद्र अरोरा, अभिषेक बोर आणि मोहंमद अजीज खान यांचा समावेश आहे. कारवाई सुरू असताना एक आरोपी पळून गेला.
हे सर्व आरोपी लोकांना राज्यसभेची जागा, राज्यपालपद देण्याच्या किंवा मंत्रालये-विभागांत नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत होते. आपण सीबीआय अधिकारी आहोत, अशी बतावणी कमलाकर करत होता. मोठ्या लोकांशी संबंध असल्याचा दावा करून तो फसवणूक करत होता आणि इतर जण त्याच्यासाठी शिकार शोधून आणण्यासाठी आणि इतरांची फसवणूक करण्यासाठी मदत करत होते. अभिषेकने कमलाकरच्या संबंधांचा उपयोग करून उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आपली पोहोच बनवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.