आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरस गँगरेप प्रकरण:जिल्हाधिकाऱ्याचा पीडित कुटुंबाला इशारा- 'सरकारचं ऐका; मीडिया आज आहे, उद्या निघून जाईल'

हाथरस7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा

हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराप्रकरणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रवीन लक्षकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते पीडित कुटुंबाला इशारा देत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी सांगत आहेत, 'तुमची विश्वासार्हता टिकवा. मीडिचा आज आहे, उद्या निघून जाईल. तुम्ही सरकारचं ऐका. तुम्ही सारी-सारी आपली साक्ष बदलू नका. तुमची इच्छा आहे, काय भरोसा, उद्या आम्हीपण बदलून जाऊ.'

यादरम्यान, उत्तरप्रदेश पोलिसांचे म्हणने आहे की, दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने ऑटोप्सी रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. प्रायवेट पार्टमध्ये पीरियडच्या दिवसांचे लक्षण मिळाले आहेत, बलात्काराचे नाही. गळ्यावर जखमांचे निशान आहेत, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे. डॉक्टर्स का कहना है कि फोरेंसिक रिपोर्ट आने के बाद ही इस बारे में कुछ कहा जा सकता है।

पोलिस म्हणाले- दोन व्हिडिओ समोर आले, यात बलात्कार झाल्याची पुष्टी नाही

एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमारने हाथरस गँगरेप प्रकरणावर म्हटले की, प्रशासन आणि पोलिसांना बदनाम केले जात आहे. अशा लोकांचा आम्ही शोध घेत आहोत. घटनेनंतर दोन व्हिडिओ समोर आले होते, त्यात पीडितेला मारहाण झाल्याचे सांगण्यात आले होते. पीडित किंवा तिच्या आईने बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. एका व्हिडिओत पीडितेने आपली जीभ दाखवली होती, त्यात ती कापलेली नव्हती. 22 सप्टेंबरला पीडितेने बलात्काराचा आरोप लावला. पण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळ्यावर जखमा असल्याची पुष्टी आहे, बलात्काराची नाही.

बातम्या आणखी आहेत...