आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hydrabad Rape | Gang rape Of A Young Woman Returning Home After A Party, Crime Against Five Minor Children, Including The MLA's Son

खळबळजनक:पार्टी करून घरी परतणाऱ्या युवतीवर सामूहिक अत्याचार, आमदारपुत्रासह पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. लक्झरी कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला असून सर्व आरोपी हायप्रोफाइल कुटुंबातील आणि अल्पवयीन आहेत. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

पोलिसांनी एका आमदारपुत्रासह पाच जणांविरुद्ध पोक्सो कायदा, बलात्कार आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त जोएल डेव्हिस यांनी सांगितले की, पीडिता केवळ एका अल्पवयीन मुलाचे नाव सांगू शकली. तक्रारीनुसार २८ मे रोजी त्याची मुलगी ज्युबिली हिल्समध्ये एका पब पार्टीत सहभागी झाली होती. तिच्या मित्राने पार्टी दिली होती. सायंकाळी ५.३० वाजता कारने आलेल्या काही मुलांसोबत ती घराकडे निघाली. आरोपींनी कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांना युवतीसोबतचे त्या तरुणांचे हॉटेलमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...