आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचा कुख्यात गँगस्टर राजू ठेहटची शनिवारी सकाळी गँगवॉरमध्ये हत्या करण्यात आली. कोचिंगच्या ड्रेसमध्ये पोहोचलेल्या हल्लेखोरांनी ठेहटला घंटी वाजवून घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. ठेहटला 3 हून जास्त गोळ्या लागल्या.
राजस्थानचे पोलिस महासंचलाक (DGP) उमेश मिश्रा यांनी सांगितले की, एका गुन्हेगाराने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. या हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रोहित गोदाराने जबाबदारी घेतली आहे.
मिश्रांनी सांगितले - गुन्हेगार पंजाब व हरियाणा सीमेच्या दिशेने पळून गेले. राजस्थान पोलिस त्यांच्या मागावर आहेत. संपूर्ण राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोड करण्याचे आदेश देण्यात आलेत. सर्वच एसचओंना फील्डवर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सिकर शहरातील पिपराली रोडवर ठेहटचे घर आहे. येथे झालेल्या गोळीबारात नागौरचा एक व्यक्तीही ठार झाला आहे. हा व्यक्ती गोळीबाराचा व्हिडिओ तयार करत होता. त्यामुळे आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला.
या भागात लावण्यात आलेल्या चारही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारही हल्लेखोर दिसून येत आहेत. यात ते शस्त्रांसह पळून जाताना दिसून येत आहेत.
गोळीबाराची माहिती मिळताच सिकरचे एसपी कुंवर राष्ट्रदीप यांच्यासह उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन डीजीपींच्या निर्देशांनुसार, संपूर्ण राज्यात नाकेबंदी केली. ठेहट गँग शेखावाटीत सक्रिय होती. तिचे आनंदपाल गँगशी हाडवैर होते. आनंदपालच्या एन्काउंटरनंतरही दोन्ही टोळ्यांत वर्चस्व युद्ध सुरू होते.
गोळी घातल्यानंतर जिवंत नसल्याची खातरजमा केली
या संपूर्ण हत्याकांडाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज उजेडात आलेत. एका फुटेजमध्ये ठेहटच्या घरापुढे ट्रॅक्टर येऊन थांबल्याचे व त्यातून 4-5 हल्लेखोर शस्त्र काढून ठेहटवर गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगार 30-40 सेकंदांपर्यंत ठेहटवर गोळीबार करतात. त्यांनी जवळपास 50 ते 60 फैऱ्या झाडल्या. त्यानंतर तो मरण पावल्याची खातरजमा केली व पळून गेले.
4 छायाचित्रांत पाहा, कशी झाली राजूची हत्या?
पळून जाताना दोनदा बदलली गाडी
सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे मूव्हमेंट नीमकाथानाच्या दिशेने झाले. हत्येनंतर त्यांची गाडी नीमकाथानामार्गे खेतडीला गेली. तिथे त्यांनी आपले वाहन बदलले.
सिकरहून ते अल्टो घेऊन पळाले होते. खेतडीत त्यांनी अल्टो सोडून क्रेटा कार घेतली. तेव्हाही त्यांनी गोळीबार केला. क्रेटा कारचा क्रमांक RJ 45 CH 1786 असल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉरेन्स गँगने घेतला हत्येचा बदला
राजू ठेहटच्या मर्डरची जबाबदारी लॉरेन्स ग्रुपच्या रोहित गोदाराने घेतली आहे. गोदारा बीकानेरच्या लूनकरणसरचा आहे. त्याने एका पोस्टद्वारे आनंदपाल व बलबीर या आमच्या मोठ्या भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ठेहटला ठार मारल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी पकडल्यानंतर सिकरमध्ये मुक्काम
राजू ठेहटची सिकरनंतर जयपूरमधील आपली मुळे मजबूत करण्याची इच्छा होती. या हेतूने त्याने जयपूरमध्ये तळ ठोकला होता.
एवढेच नाही वादग्रस्त जमिनी व सट्टा बाजारावरही त्याची नजर होती. पण महेश नगर पोलिस ठाणे पोलिसानी शांतता भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी त्याला अटक केली. त्यानंतर राजू ठेहटला परत सिकरला शिफ्ट व्हावे लागले.
सिकर बॉस म्हणून कुख्यात होता
गँगस्टर राजू ठेहट लक्झरी लाइफसाठी ओळखला जात होता. त्याच्यासोबत महागड्या कारी व बाइकचा ताफा सोबत असे. गँगस्टर राजू ठेहट सिकरचा बॉस म्हणूनही कुप्रसिद्ध होता.
जयपूर तुरुंगात असताना ठेहटने आपली टोळी वाढवण्याच्या हेतूने जयपूरला मुक्काम ठोकला होता. त्याला जयपूरच्या स्वेज फार्मच्या ज्या घरातून पकडले, त्याची किंमत जवळपास 3 कोटी असल्याचे सांगण्यात येते.
राजस्थानात गँगस्टर आनंदपाल सिंह व राजू ठेहटमध्ये जवळपास 2 दशकांपासून वर्चस्वाचा वाद सुरू होता. आनंदपालच्या एन्काउंटरनंतर राजू ठेहटचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
तुरुंगात असतानाही त्याने खंडणी मागितल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या. राजू ठेहट गँगमधील (RTG) अनेक जण गँगस्टरला मिळाले होते.
रील बनवून सोशल मीडियावर टाकली
गँगस्टर राजू ठेहटने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर सक्रिय राहण्यासाठी त्याने रील तयार करून सोशल मीडियावर टाकल्या. महागड्या कारी व बाईकची आवड असणारा राजू ठेहट जयपूर स्थित आपल्या ठिकाण्यावर अनेकदा फिरताना आढळला. त्याने आपल्या अंगरक्षकांसह अनेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकले होते.
9 महिन्यांनंतर जयपूरमध्ये ठेहटसह त्याच्या 4 सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यात 3 गनमॅन व एका स्वयंपाक्याचा समावेश होता. जवळपास 3 महिन्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर राजू ठेहटने गँग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेकजण त्याच्या टोळीत सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.