आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तुरुंग मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गँगस्टर लॉरेन्सने तुरुंगातून व्हिडिओ कॉल करून खुले आव्हान दिले आहे. पंजाब डीजीपी गौरव यादव यांनी पहिल्या मुलाखतीला नकार दिला असला तरी 24 तासांतच सीएम मान यांनी सर्व विभागांमध्ये फेरबदल करून तुरुंग विभागाचा ताबा स्वतःकडे घेतला होता.
गँगस्टर लॉरेन्सची पहिली मुलाखत 14 मार्चच्या संध्याकाळी प्रसारित झाली. तेव्हापासून आप सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. 15 मार्च रोजीच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केले. गोइंदवाल कारागृह आणि आता लॉरेन्स पार्ट-1 नंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्री हरजोत बैंस यांच्याकडून कारागृह खाते ताब्यात घेतले होते.
डीजीपी पंजाबनेही पहिल्या मुलाखतीनंतर स्पष्टपणे सांगितले की, लॉरेन्सची मुलाखत पंजाबबाहेर झाली असावी. 16 मार्च रोजी स्वत: डीजीपी गौरव यादव यांना पत्रकार परिषद घेऊन मुलाखत भाग-1 बाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. विशेष म्हणजे पंजाबमधील गुंडगिरी संपवण्याची भाषा करणाऱ्या आप सरकारचे गृहमंत्रालयही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे आहे. सीएम मान यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांनी लॉरेन्सची दुसरी मुलाखत प्रसारित झाल्यानंतर पंजाब सरकारवर हल्ला झाला आहे.
बॅरेकमधून फोन केल्याचे पुरावे दिले
मुलाखत भाग-2 मध्ये लॉरेन्सने तुरुंगातून मुलाखत दिल्याचे पुरावेही दिले. त्याने आपली बॅरेकही दाखवली आणि सांगितले की त्याला बाहेर जाऊ दिले जात नाही, पण त्याच्याकडे मोबाइल आणि सिग्नलही येतो. भटिंडा हे पंजाबमधील सर्वात सुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जाते, ज्यात जॅमर लावण्यात आले आहे. सिग्नल आहे की नाही, हे पाहण्यासाठी रक्षक दररोज बॅरेकमध्ये जातात, असा दावा डीजीपींनी केला आहे.
जेलच्या चुकाही दाखवल्या
आपल्या मुलाखतीत लॉरेन्सने तुरुंगाच्या बॅरेकमधून मुलाखती दिल्याचे पुरावे देताना तुरुंगातील कमकुवतपणाही उघड केला. लॉरेन्स म्हणतो की, तुरुंगाचे रक्षक रात्रीच्या वेळी क्वचितच येतात आणि जातात, म्हणूनच तो रात्री फोन करतो.
मोबाइल बाहेरून फेकला जातो
लॉरेन्सने आतमध्ये मोबाइल मिळाल्याची माहितीही दिली. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, जेलमध्ये बाहेरून मोबाइल फेकले जातात. काहीवेळा तुरुंगातील कर्मचारीही मोबाइल जप्त करतात, मात्र बहुतांश वेळा त्याच्यापर्यंत मोबाइल पोहोचतो.
कायदा आणि सुव्यवस्थेमुळे सीएम मान आधीच टार्गेटवर
लॉरेन्सच्या तुरुंगातील मुलाखत भाग-2 नंतर सीएम मान विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्याचबरोबर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मान आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. सीएम मान यांनी गृहमंत्रालय आधीच आपल्या हातात ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.