आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gangster Lawrence's Brother Anmol Arrested In Kenya I Explanation Of Ministry Of External Affairs

वाँटेड अनमोल केनियात अटक:परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण; मुसेवाला हत्याकांडातील गँगस्टर लॉरेन्सचा आहे अनमोल भाऊ

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल यालाही केनियात ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. अनमोल मुसेवाला खून प्रकरणातील वॉंटेड होता. यापुर्वी मुसेवाला यांचा पुतण्या सचीन थापन यालाही ताब्यात घेण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, मुसेवाला हत्याकांडातील संशयितांना अझरबैजान आणि केनियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. याबाबत कारवाई झालीच पाहिजे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या लॉरेन्स टोळीने केलेली होती.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या लॉरेन्स टोळीने केलेली होती.

बनावट पासपोर्टवर काढला विदेशात पळ

मुसेवालाच्या हत्येपूर्वी लॉरेन्सचा भाऊ अनमोल आणि पुतण्या सचिन थापन परदेशात बनावट पासपोर्टच्या सहाय्याने पळून गेले होते. लॉरेन्सने त्यांना बनावट पासपोर्ट बनवून फरार केले होते. दोघेही आधी नेपाळला गेले. त्यानंतर कॅनडा आणि दुबईला गेले. तेथून सचिन थापन अझरबैजानला गेला. तिथे त्याला ताब्यात घेण्यात आले. अनमोल तिथून केनियाला पळून गेला. तोही तिथे पकडला गेला आहे. दोघांकडे बनावट नावे पत्त्यांचे पासपोर्ट होते.

दोघेही गोल्डी ब्रारच्या संपर्कात होते मुसेवाला खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनमोल आणि सचिन थापन हे कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या संपर्कात होते. नेमबाज आणि शस्त्रे पुरवण्यातही सचिन थापनची महत्त्वाची भूमिका होती. यापूर्वी अनमोलचे लोकेशन ट्रेस झाल्याची चर्चा होती.

बातम्या आणखी आहेत...