आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगस्टर लॉरेन्सचा भाचा सचिन थापन जेरबंद:भाऊ अनमोल कॅनडाहून केनियाला पळाला; मुसेवालांच्या हत्येपूर्वी दोघेही झाले होते पसार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाइंड सचिन थापन याला अझरबैजान येथे अटक करण्यात आली आहे. तर गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याचे लोकेशन केनियामध्ये आढळले आहे. हे दोघेही मुसेवालाच्या हत्येपूर्वी बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतातून पसार झाले होते. याची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सचिनला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे रोजी मानसात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी लॉरेन्स गँगचा कॅनडातील म्होरक्या गोल्डी बरार याने घेतली होती.

सचिनला फेक पासपोर्ट प्रकरणात अटक

सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनला फेक पासपोर्टच्या मदतीने प्रवेश केल्याप्रकरणी अझरबैजानमध्ये महिन्याभरापूर्वी अटक करण्यात आली. त्याची माहिती काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली. ही माहिती मिळताच परराष्ट्र मंत्रालयाने पंजाब पोलिसांकडून सचिन थापन याचे क्रिमिनिल रेकॉर्ड मागवले. त्याच्या अरेस्ट वॉरंटसह सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील त्याच्या भूमिकेचीही माहिती मागवली आहे. या दस्तावेजांच्या माध्यमातून त्याला अझरबैजानहून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

सचिन थापनचा बोगस पासपोर्ट.
सचिन थापनचा बोगस पासपोर्ट.

अनमोल प्रथम कॅनडा व नंतर केन्याला पळाला

सूत्रांच्या माहितीनुसार, मुसेवालांच्या हत्येपूर्वी अनमोल व सचिन नेपाळला पळाले. पलायन करण्यापूर्वी त्यांनी फेक पासपोर्ट तयार केला नेपाळहून दोघेही अझरबैजानला गेले. तिथे पोहोचल्यानंतर अनमोल कॅनडाला गेला. तर सचिनला फेक पासपोर्ट प्रकरणी अटक झाली. याची माहिती मिळताच अनमोल कॅनडाहून केन्याला पळाला.

अनमोलच्या पासपोर्टवर देण्यात आली फेक माहिती.
अनमोलच्या पासपोर्टवर देण्यात आली फेक माहिती.

लॉरेन्सने हत्येपूर्वी भारताबाहेर पाठवले

पंजाब पोलिसांनी लॉरेन्स व गोल्डी बरारसह सचिन थापन व अनमोल मुसेवाला हत्याकांडाचे मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट केले होते. मुसेवालाच्या हत्येपूर्वी लॉरेन्सने त्यांचे फेक पासपोर्ट तयार केले होते. त्याच आधारावर त्याने त्यांना देशाबाहेर काडले. त्यानतंर 29 मे रोजी मुसेवालाची हत्या करण्यात आली. सचिन थापनने नंतर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हत्येची जबाबदारी घेतली होती.

गोल्डीच्या मदतीने केली हत्या

मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार कारागृहात बसून लॉरेन्सने रचली. त्यानंतर अनमोल व सचिनने कॅनडातील गँगस्टर गोल्डी बरारसोबत बसून संपूर्ण हत्येचा कट रचला. त्यांनी मुसेवालाची रेकी केली. त्यानंतर शूटर्स व त्यांच्यासाठी शस्त्रांची व्यवस्था केली. सचिन व अनमोलने मुसेवालांची हत्या करावी. पण त्यांचे नाव कुठेही येवू नये, असा लॉरेन्सचा प्रयत्न होता.

बातम्या आणखी आहेत...