आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gangster Vikas Dubey Arrested; Kanpur Encounter News | Know How History Sheeter And UP Wanted Gangster Vikas Dubey Reach To Madhya Pradesh Mahakal Temple From Kanpur Bikaru Village

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विचारपूर्वक केलेले आत्मसमर्पण:गँगस्टरच्या अटकेवर उद्भवले 10 प्रश्न; विकास दुबेने 4 राज्यात 1250 किमीचा प्रवास केला, पण त्याला पकडले महाकाल मंदिराच्या गार्डने

कानपूर/उज्जैन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी आलेला गँगस्टर विकास दुबे - Divya Marathi
उजैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी आलेला गँगस्टर विकास दुबे

उत्तर प्रदेशातील 10 पोलिसांची हत्या करुन फरार झालेल्या गँगस्टर विकास दुबेला गुरुवारी सकाळी उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली.  सहा दिवसात तो चार राज्यात फिरला. यातील तीन राज्ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात भाजपची सरकार आहे. विकास दुबेने यादरम्यान, 1250 किलोमीटरचा प्रवास बाइक, ट्रक, कार आणि ऑटोने केला. उत्तर प्रदेश सरकारचे 100 पेक्षा जास्त जवान विकासचा शोध घेत होते, पण शेवटी त्याला उजैनच्या महाकाल मंदिरातील गार्डने पकडले. परंतू, त्याच्या एकदम आरामात झालेल्या अटकेमागे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

1. शूटआउटनंतर दोन दिवस कानपूरमध्ये कसाकाय राहिला ?

हे प्रकरण 2 जुलैला सुरू झाले. विकास दुबेला अटक करण्यासाठी आलेल्या युपी पोलिसांनी कानपूरजवळील बिकरू गावात दबा दिला. विकास आणि त्याच्या गुडांनी डीएसपी रँकेतील सीओसह आठ पोलिसांची हत्या केली. शूटआउटदरम्यान तो घराबाहेरील बाईकवरुन पळून गेला. यानंतर  विकास दोन दिवस कानपूरच्या शिवलीमधील आपल्या मित्राकडे थांबला, पण यूपी एसटीएफ आणि 40 पोलिस स्टेशनच्या पोलिसांना याची कोणतीच माहिती नव्हती. 

2. कानपूरवरुन 92 किमीचे अंतर पार करुन औरैयाला कसा पोहचला ?

शिवलीनंतर विकास एका ट्रकमध्ये बसून 92 किलोमीटर दूर असलेल्या औरैयाला गेला. कडक नाकाबंदी असूनही पोलिस त्याला पकडू शकले नाही.

3. औरैयावरुन 385 किमीचे अंतर पार करुन फरीदाबादला कसा गेला ?

औरैयानंतर विकास हरियाणातील फरीदाबादला गेला. तो कारने फरीदाबादला गेल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी दुपारी 3:19 वाजता त्याची शेवटची लोकेशन फरीदाबादमध्ये असल्याचे समजले.

4. फरीदाबादमधील सीसीटीवीत दिसला, पण अटक झाली नाही ?

हरियाणा पोलिस आणि यूपी एसटीएफचे पथक फरीदाबादच्या हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच विकास पसार झाला. यावेळी तो एका ऑटोमध्ये बसत असल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसले. त्यानंतर तो एका नातलगाकडे गेला, पण पोलिस येण्यापूर्वीच तो पळून गेला. पोलिसांनी त्याच्या त्या नातलगाला ताब्यात घेतले. 

5. फरीदाबादवरुन 773 किमी दूर उज्जैनला कसा गेला ? 

विकास सोमवारी फरीदाबादमध्ये दिसला होता. त्यानंतर दोन दिवस तो कुठे होता, हे माहित नाही. पण, गुरुवारी सकाळी तो उजैनच्या महाकाल मंदिरात दिसला. येथूनच पोलिसांनी त्याला अटक केले. 

6. फरीदाबादवरुन उज्जैनपर्यंत कोणत्याच राज्याच्या पोलिसांनी त्याला पाहिले नाही, पाहिले ते महाकाल मंदिराच्या गार्ड ने ?

असाही एक प्रश्न उपस्थित होतो की, विकासकडे कोणती गाडी होती का, ज्यातून तो इतक्याराज्यात फिरुन मध्यप्रदेशात दाखल झाला? फरीदाबादमध्ये सीसीटीव्हीत दिसल्यानंतर पोलिस सतर्क झाले होते, तरीदेखील 17-18 तासांचा रस्ता पार करुन तो उज्जैनला कसाकाय गेला? हरियाणा, यूपी, एमपीच्या पोलिसांना तो दिसला नाही? इतक्या पोलिसांना चकवा देणाऱ्या विकासला मंदिराच्या गार्डने पकडले ?

7. हे विचारपूर्वक केलेले आत्मसमर्पण नाही का ?

ही अटक नाही, विचारपूर्वक केलेले आत्मसमर्पण आहे. असे यामुळे म्हटले जात आहे की, 8 पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर आरामात महाकाल मंदिराचा व्हीआयपी पास काढून मंदिरात दर्शन घ्यायला जातो. पोलिस त्याची बाहेर येण्याची वाट पाहतात आणि त्याला अटक करतात. त्याला अटकही स्थानिक पोलिस करतात. यावेळी एसटीएफ, कमांडो किंवा एटीएसची गरज पडली नाही ?

8. दोन वकीलांनी विकासला लखनऊवरुन उज्जैनला सोडले?

विकास दुबेच्या सरेंडरनंतर पोलिसांनी दोन वकीलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे. हे दोघे लखनऊवरुन उजैनला आले होते. त्यांच्यावर विकासला उजैनला आणण्याचा आरोप आहे.

9. यात खादी आणि खाकीचे संगणमत आहे का?

यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंहदेखील प्रश्न विचार आहे की, विकास उजैनला कसाकाय गेला? ते म्हणतात की, विकासची चौकसी केल्यावर मोठ-मोठ्या लोकांचे नाव समोर येईल. यात आयएएस, आयपीएस आणि राजकारण्यांचे नाव समोर येऊ शकते. विकासची उजैनमधील अटक विचार करण्याच्या पलीकडची आहे.

10. काँग्रेस थेट आरोप का लावत आहे ?

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह थेट आरोप करत आहेत की, ‘उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाउंटरपासून वाचण्यासाठी केलेल्या आत्मसमर्पण आहे. मला असे वाटते की, मध्यप्रदेशातील एका जेष्ठ भाजप नेत्यामुळे हे झाले आहे. शिवराज विनाकारण हे श्रेय घेत आहेत. श्रेय गृह मंत्र्यांना द्यायला हवे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत नरोत्तम मिश्रा (विद्यमान गृह मंत्री) भाजपचे कानपूर जिल्हा प्रभारी होते.’

बातम्या आणखी आहेत...