आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांना दिलासा:राजस्थानमध्‍ये उज्ज्वला याेजनेत 500 रुपयांत गॅस सिलिंडर

अलवर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानात काँग्रेस सरकारने आगामी निवडणुकीवर डाेळा ठेवून अर्थसंकल्पापूर्वी गरिबांना दिलासा दिला आहे. एक एप्रिलपासून बीपीएल व उज्ज्वला याेजनेंतर्गत येणाऱ्या लाेकांना ५०० रुपयांत स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर मिळणार आहे. अलवरच्या मालाखेडामध्ये राहुल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेदरम्यान मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत यांनी ही घाेषणा केली. ते म्हणाले, देशात नागरिकांना महागाईच्या झळा साेसाव्या लागत आहेत. केंद्राच्या उज्ज्वला याेजनेमुळे कुणाचेही भले झाले नाही. गॅस सिलिंडरची किंमत १०३६ रुपये झाली आहे. पुढील महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाईल.

बातम्या आणखी आहेत...