आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gas Cylinders Cost , Petrol diesel Also On The Rise; Cylinder Price Hiked By Rs 90 Four Times Since July

दरवाढ:गॅस सिलिंडर 15 रुपये महाग, पेट्रोल-डिझेलही उच्चांकावर; जुलैपासून चार वेळा 90 रुपयांनी सिलिंडर दरवाढ

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैनंतर चौथ्यांदा एलजीपी गॅसचे दर महागले आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढीसोबतच स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही महाग झाला अाहे. बुधवारी एलपीजीचे दर १५ रुपयांनी वाढवण्यात आले. यासोबतच दिल्ली व मुंबईत गॅसचे दर ८९९.५० रुपये प्रति सिलिंडर झाले आहेत. अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडरचे दर महागले आहेत. दुसरीकडे, पेट्रोल ३० पैसे तर डिझेलमध्ये लिटरमागे ३५ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल १०२.९४ रुपये व डिझेल ९१.४२ रुपयांवर गेले. हे आजवरचे उच्चांकी दर आहेत.

जुलैनंतर चौथ्यांदा एलजीपी गॅसचे दर महागले आहेत. जुलैत दर प्रति सिलिंडर २५.५ रुपयांनी वाढले होते. यानंतर १७ ऑगस्ट व एक सप्टंेबरला २५-२५ रुपयांची दरवाढ झाली होती. जुलैपासून आजवर १४.२ किलो सिलिंडरचे दर ९० रुपयांनी वाढले आहेत. दरवाढीनंतर ५ किलोचे सिलिंडर ५०२ रुपयांवर पोहोचले आहे. सरकारने बहुतांश शहरांत एलपीजीवरील अनुदान संपुष्टात आणले आहे. एका वर्षात अनुदानित १४.२ किलोच्या १२ सिलिंडरसाठी पात्र व उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सिलिंडरसाठी बाजार मूल्याने पैसे द्यावे लागतात.

बातम्या आणखी आहेत...