आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gas Leak In Andhra Pradesh Chemical Plant | Visakhapatnam Gas Leak News Updates In Photos

आंध्र वायू गळती दुर्घटनेचे फोटो:प्रत्यक्षदर्शींनी सांगितले - लोक श्वास घेऊ शकत नव्हते, जो जिथे उभा होता तिथेच कोसळला; पोलिस म्हणाले- पीडितांपर्यंत पोहोचणे खूप कठीण होते

विशाखापट्टनमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो गॅस गळतीनंतरचा आहे. वेंकटापुरममधील एलजी पॉलिमर कंपनीची स्थापना 1961 मध्ये झाली होती. - Divya Marathi
हा फोटो गॅस गळतीनंतरचा आहे. वेंकटापुरममधील एलजी पॉलिमर कंपनीची स्थापना 1961 मध्ये झाली होती.
  • गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली दुर्घटना. पोलिस आणि बचाव दलाला लोक रस्त्यावर पडलेले आढळले

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील व्यंकटपुरम गावात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास रासायनिक कारखान्यात स्टायरीन गॅस गळतीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका मुलाचा समावेश आहे. एलजी पॉलिमर इंडस्ट्रीच्या प्लांटमधून गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे.  मीडिया रिपोर्टनुसार एक हजाराहून अधिक लोक आजारी पडले आहेत. स्टायरीन गॅस प्लास्टिक, फायबर ग्लास, रबर आणि पाईप्स बनवण्यासाठी वापरला जातो.

पोलिस आणि बचाव दलाला लोक रस्त्यावर पडलेले आढळले
पोलिस आणि बचाव दलाला लोक रस्त्यावर पडलेले आढळले

गावातील लोकांनी सांगितले की, गॅसचा परिणाम प्लांटच्या आसपासच्या तीन किमी क्षेत्रात झाला. जो जिथे होता तिथेच कोसळला. पोलिस आणि मदत पथकाला लोकांपर्यंत पोहोचण्यास अडचणी आल्या. गोपालापट्टनम सर्कलमधील पोलिसांनी सांगितले की त्यांना सुमारे 50 लोक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळले. घटनास्थळी पोहोचण्यात खूपच अडचण झाली.

गॅस गळतीमुळे लोक अशाप्रकारे रस्त्यावर पडले होते.
गॅस गळतीमुळे लोक अशाप्रकारे रस्त्यावर पडले होते.
लोकांना सुरक्षितस्थळी हलवताना
लोकांना सुरक्षितस्थळी हलवताना
गॅस गळतीमुळे बेशुद्ध पडलेल्या महिला
गॅस गळतीमुळे बेशुद्ध पडलेल्या महिला
गॅस गळतीचा परिणाम 3 किमी क्षेत्रापर्यंत झाला
गॅस गळतीचा परिणाम 3 किमी क्षेत्रापर्यंत झाला
गॅस गळती दुर्घटनेती पीडितांना मदत करताना लोक
गॅस गळती दुर्घटनेती पीडितांना मदत करताना लोक
दुर्घटनेनंतर पोलिसांनी पीडितांपर्यंत पोहचताना अडचणींचा सामना करावा लागला.
दुर्घटनेनंतर पोलिसांनी पीडितांपर्यंत पोहचताना अडचणींचा सामना करावा लागला.
पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
बातम्या आणखी आहेत...