आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gautam Adani Become World's Third Richest Person । Surpasses Louis Vuitton's Bernard Arnault

अदानी ठरले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत:11 लाख कोटींच्या संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्टना टाकले मागे, आता फक्त मस्क-बेझोस पुढे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय अब्जाधीश गौतम अदानी 137.4 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 11 लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्टला मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या टॉप थ्रीमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आता ते रँकिंगमध्ये मस्क आणि बेझोस यांच्या मागे आहे. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क 251 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल, तर बेझोस 153 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. टॉप-10 यादीत अदानी हे एकमेव भारतीय आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी $91.9 अब्ज (7.3 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 11व्या क्रमांकावर आहेत.

हे आहेत जगातील टॉप 10 श्रीमंत

रँकनावनेटवर्थ
1एलन मस्क251 बिलियन डॉलर
2जेफ बेझोस153 बिलियन डॉलर
3गौतम अदानी137 बिलियन डॉलर
4बर्नार्ड अर्नाल्ट136 बिलियन डॉलर
5बिल गेट्स117 बिलियन डॉलर
6वॉरेन बफे100 बिलियन डॉलर
7लॅरी पेज100 बिलियन डॉलर
8सर्गेई ब्रिन95.8 बिलियन डॉलर
9स्टीव्ह बाल्मर93.7 बिलियन डॉलर
10लॅरी एलिशन93.3 बिलियन डॉलर

गेल्या महिन्यात बिल गेट्सना टाकले होते मागे

गेल्या महिन्यात अदानी हे चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते. त्यांनी बिल गेट्सना मागे टाकले होते. केवळ 2022 मध्येच अदानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 60.9 बिलियनची भर घातली आहे. हे प्रमाण कोणत्याही उद्योगपतीपेक्षा 5 पट जास्त आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव कोरले होते.

एप्रिल 2021 मध्ये 57 अब्ज डॉलर होती अदानींची संपत्ती

अदानी 4 एप्रिल रोजी सेंटिबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटिबिलियनेर म्हणतात. एक वर्षापूर्वी एप्रिल 2021 मध्ये, अदानींची एकूण संपत्ती 57 अब्ज होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात अदानींची एकूण संपत्ती जगातील सर्वात वेगाने वाढली. अदानी समूहाच्या 7 सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कंपन्या आहेत.

NDTV मधील भागीदारी खरेदी करण्यावरून चर्चेत

अदानी समूहाने त्यांची उपकंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCPL) मार्फत NDTV ची प्रवर्तक कंपनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​99.99% शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, काही कायदेशीर कारणांमुळे हे प्रकरण अडकले आहे.

सिमेंट व्यवसायातही टाकले पाऊल

यापूर्वी मे महिन्यात गौतम अदानी यांच्या कंपनीने होल्सीमचा भारतीय सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा करार 10.5 अब्ज डॉलरमध्ये झाला होता. या करारामुळे अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात एका क्षणात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

इस्रायलमधील बंदर चालवण्यासाठी अदानी समूहाने जुलैमध्ये ते भाडेतत्त्वावर घेतले होते. त्याचप्रमाणे, कंपनीने आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील रोड टोल व्यवसाय मॅक्वेरी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर 3,110 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर

गौतम अदानी यांचा समूह देशातील सर्वात मोठा विमानतळ ऑपरेटर आहे. या समूहाकडे देशातील 7 विमानतळांची कमांड आहे. मुंबई विमानतळाव्यतिरिक्त, अदानींकडे अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळे आहेत.

भारतातील सर्वात मोठे खासगी बंदर ऑपरेटर

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ Ltd.) ही भारतातील सर्वात मोठी खासगी पोर्ट ऑपरेटर आणि एंड-टू-एंड लॉजिस्टिक प्रदाता आहे. दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत, त्यांनी संपूर्ण भारतातील बंदर पायाभूत सुविधा आणि सेवांचा पोर्टफोलिओ तयार केला आहे.

त्यांचे 13 स्ट्रॅटेजिकली लोकेटेड पोर्ट्स आणि टर्मिनल देशाच्या पोर्ट क्षमतेच्या 24% प्रतिनिधित्व करतात. हे 26 मे 1998 रोजी इनकॉर्पोरेट करण्यात आले होते. पूर्वी त्याचे नाव गुजरात अदानी पोर्ट लिमिटेड (GAPL) होते.

बातम्या आणखी आहेत...