आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gautam Gambhir | ISIS | MP Gautam Gambhir Receives Death Threats From ISIS Kashmir; Police Increase Security Outside Gambhir's Home

गंभीरला धमकी:खासदार गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी वाढवली गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी गौतम गंभीरने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमी देण्यात आली. या प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहे. गंभीरला धमकी मिळाल्याचे वृत्त समोर येताच त्याच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गौतम गंभीर आपल्या वादग्रस्त वक्तृत्वामुळे नेहमी चर्चेत असतो. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तो नेहमीच चर्चा करताना पाहायला मिळतो. नुकतेच त्याने नवज्योतसिंग सिद्धूवर टीकास्त्र केले होते. गंभीरने सिद्धूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला “मोठा भाऊ” म्हटल्यावरून घेरले होते.

गंभीर म्हणाला होता की, 'आधी आपल्या मुलांना सीमेवर पाठवा आणि नंतर अशी विधाने करत फिरा.' पुढे गंभीर म्हणाला होता की, गेल्या 70 वर्षांपासून भारत पाकिस्तानच्या आतंकवाद्याविरुद्ध लढत आहे. आणि सिद्धू हे त्या आतंकवादी देशातील पंतप्रधानांना मोठ्या भावाची प्रतिमा देत आहे. हे खूपच लज्जास्पद आहे. अशी टीका गंभीरने केली होती.

सिद्धूसह गंभीर यांनील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील निशाणा साधला होता. अयोध्या यात्रेवरून आक्रमक होत गंभीर म्हणाला होता की, दिल्लीचे मुख्यमंत्री राजकारणात ‘दुटप्पीपणा’चे राजकारण करत आहेत आणि रामजन्मभूमी स्थळी पूजा करून ‘आपली पापे धुवून’ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांना माहिती आहे की, अरविंद केजरीवाल यांची राम मंदिराबद्दल काय भुमिका आहे.

सध्या ते अयोध्येत जाऊन आपले पाप धुण्याचे प्रयत्न करत आहेत. केजरीवाल हे राजकारणातील ढोंगी आणि दुटप्पीपणाचे दुसरे नाव आहे. एआयएमआयएम सारखे पक्ष काही प्रकारे केजरीवाल यांच्यापेक्षा चांगले आहेत. कारण ते त्यांच्या जातीय अजेंडा आणि कामाबद्दल स्पष्ट आहेत. असा हल्लाबोल गंभीर यांनी केजरीवालवर केला होता.

बातम्या आणखी आहेत...