आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gaya Junction | Marathi News | Fire Erupts At Gaya Junction, Tensions Rise In Jehanabad Samastipur; Police Fired Tear Gas Canisters

बिहारमध्ये रेल्वे परीक्षार्थी आक्रमक:गया जंक्शनवर उभ्या असलेल्या रेल्वेला लावली आग, जहानाबाद-समस्तीपुरमध्येही तणावाचे वातावरण; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

गया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

RRB-NTPC निकालात झालेल्या हेराफेरीच्या विरोधात यूपी-बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन बुधवारीही सुरूच होते. संतप्त विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे ट्रेन पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. जहानाबाद, समस्तीपूर, रोहताससह अनेक भागात विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी सुरू केली. आंदोलक विद्यार्थ्यांमुळे अनेक ठिकाणी गाड्या ठप्प झाल्या. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

एडीजी निर्मल कुमार आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस, आरपीएफ यांच्यासह जिल्हा पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. स्वत: गयाचे एसएसपीही घटनास्थळी हजर झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी पोलिस रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. यासोबतच सर्व रेल्वे जिल्हा पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण, विद्यार्थी कधीही कुठेही रेल्वे रुळावर पोहोचून गोंधळ घालू शकतात.

जहानाबादमध्ये तिरंगा घेऊन संतप्त आंदोलक
जहानाबादमध्ये तिरंगा घेऊन संतप्त आंदोलक

भोजपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी आरा-सासाराम पॅसेंजरच्या इंजिनला आग लावली. यादरम्यान विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील घातला होता. त्यामुळे हावडा-दिल्ली मुख्य मार्ग आरा पश्चिम ओव्हरब्रिजजवळील रेल्वे ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली. विद्यार्थ्यांनी अनेक गाड्यांवर दगडफेकही केली त्यामुळे मालगाडीच्या इंजिनचेही नुकसान झाले.

गया-पाटणा रेल्वे सेक्शनवर जहानाबाद रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत केली होती. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मेमू ट्रेन पॅसेंजरला रोखून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विद्यार्थी रेल्वे रुळावर बसून आंदोलन करत असून, रेल्वेचे कामकाज ठप्प झाले आहे. रेल्वे स्थानकाचे पोलिस विद्यार्थ्यांना समजावण्याच्या प्रयत्न करत आहे.

ट्रॅकवर असलेल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगताना पोलिस.
ट्रॅकवर असलेल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगताना पोलिस.
समस्तीपूरमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेन रोखली.
समस्तीपूरमध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेन रोखली.

समस्तीपूरमध्ये विद्यार्थी रुळावर उतरले

समस्तीपूरमध्ये विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वैशाली सुपरफास्ट, टाटा छपरा, ग्वाल्हेर-बरौनी ट्रेन बचवारा आणि इतर ठिकाणच्या रेल्वेगाड्या देखील उभ्या होत्या. अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी संतप्त विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते कोणाचेच ऐकत नाहीत आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...