आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gaziabad UP Thief Returns Jewelry By Courier, Theft In Teacher's Flat, Parcel Sent In The Name Of Jewelry Shop

चोरट्यांना उपरती, चोरलेले दागिने कुरिअरने केले परत:गाझियाबादेत शिक्षकाच्या फ्लॅटमध्ये चोरी; ज्वेलरी शॉपच्या नावाने पाठवले पार्सल

गाझियाबाद (उत्तर प्रदेश)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे महिला शिक्षिकेच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी 25 हजारांची रोकड आणि 14 लाखांचे दागिने चोरून नेले. घटनेनंतर सुमारे चार दिवसांनी त्यांनी कुरिअरने पार्सल पाठवून चार लाख रुपये किमतीचे दागिने परत केले. आता पीडिता आणि पोलिसांनाही आश्चर्य वाटतंय की हे सगळं कसं घडलं? सध्या कुरिअर पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

असे आहे प्रकरण

प्रीती सिरोही या मूळच्या बुलंदशहरच्या रहिवासी आहेत. गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशन येथे असलेल्या फॉर्च्युन रेसिडेन्सीमध्ये त्या त्यांच्या कुटुंबासह राहतात. प्रीती सिरोही 23 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यासाठी बुलंदशहरला गेल्या होत्या. 27 ऑक्टोबरला संध्याकाळी फ्लॅटवर परतल्या. येथे त्यांना फ्लॅटचे कुलूप व दार तुटलेले दिसले. घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब होते. त्यांनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

हा संशयित व्यक्ती दिवाळीच्या सुमारास सोसायटीत आला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हा संशयित व्यक्ती दिवाळीच्या सुमारास सोसायटीत आला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डीटीडीसी कुरिअर बॉयने पार्सल दिले

प्रीती सिरोही म्हणाल्या, '29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता डीटीडीसी कंपनीचा कुरिअर बॉय पार्सल घेऊन त्यांच्या फ्लॅटवर आला. पार्सलवर माझे नाव, फ्लॅट आणि मोबाइल नंबरही लिहिलेला होता. पाकीट उघडले असता त्यात चोरीला गेलेले दागिने परत आल्याचे आढळून आले. पाकिटात सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. कृत्रिम दागिन्यांचा एक बॉक्सही होता, तो त्या दिवशी चोरीला गेला होता.

ज्या नावाने पार्सल बुक केले होते, त्या नावाचे दुकान नाही

प्रीती यांनी तत्काळ गाझियाबाद पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. राजदीप ज्वेलर्स हापूडच्या नावाने हे पार्सल पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस हापूड सराफा मार्केटमध्ये पोहोचले, मात्र त्या नावाचे दुकान नव्हते.

त्यानंतर हापूड येथील डीटीडीसी कुरिअर सेंटरवर पोहोचल्यानंतर तपास करण्यात आला. तपासात दोन मुलांनी येऊन पार्सल बुक केल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर सेंटरचे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन्ही संशयित मुलांचा शोध सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणात जवळच्या व्यक्तीचाही या चोरीत सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण सहसा चोराला फ्लॅट मालकाचे नाव आणि मोबाइल क्रमांक माहीत नसतो, या दोन्ही गोष्टी पार्सलवर लिहिलेल्या असतात.

बातम्या आणखी आहेत...