आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील १५व्या आणि राजस्थानच्या पहिल्या वंदे भारत रेल्वेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे अजमेर ते दिल्ली धावणार आहे. जयपूर स्थानकात झालेल्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री अशोक गहलोत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
मोदी म्हणाले, गहलोतजी राजकीय संकटातून जाताहेत. असे असतानाही ते विकासाच्या कामासाठी वेळ काढून हजर राहिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच व्हायला हवे होते, ते आतापर्यंत होऊ शकले नाही. मात्र, तुमचा माझ्यावर इतका विश्वास आहे की, तुम्ही ती कामे माझ्यासमोर ठेवली. माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, पूर्वी कोणती ट्रेन धावणार, कोण रेल्वेमंत्री होणार, हे राजकीय स्वार्थ ठरवत असे. तेव्हा रेल्वे भरतीत भ्रष्टाचार व्हायचा. रेल्वेला राजकीय आखाडा बनवले होते. राजकीय दबाव हटला तेव्हा रेल्वेनेही सुटकेचा श्वास घेतला. आज प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे.
पूर्वीच्या निर्णयांना भ्रष्टाचार प्रेरित म्हणणे दुर्दैवी : गहलोत
मुख्यमंत्री अशोक गहलोत सोशल मीडियावर मोदींच्या वक्तव्याबाबत म्हणाले, २०१४ पूर्वीच्या रेल्वे मंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णयांना भ्रष्टाचार व राजकीय स्वार्थाने प्रेरित म्हणणे दुर्दैवी आहे. रेल्वेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न तर तुम्ही स्वतंत्र अर्थसंकल्प संपवून केला. तुम्ही विधानसभा-लोकसभा निवडणूक पाहून भाषण दिले आहे. हे भाषण भाजपचा निवडणूक अजेंडाच आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.