आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Genome Sequencing : 65 Thousand Sequencing Done In 18 Months .. Now It Will Be 80 Thousand Per Month, Great Preparation To Identify Variants

जीनोम सिक्वेन्सिंग:18 महिन्यांत 65 हजार सिक्वेन्सिंग झाले.. आता दरमहा 80 हजार होणार, व्हेरिएंट ओळखण्याची मोठी तयारी

नवी दिल्ली (पवनकुमार )17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओने एकूण कोरोना रुग्णांपैकी ५% चे सिक्वेन्सिंग करण्यास सांगितले, पण भारतात ०.१७% झाल्याने खासगी प्रयोगशाळाही सिक्वेन्सिंगच्या तयारीत

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आला तरच तिसरी लाट येऊ शकते, असे महामारीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच नवीन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी जास्तीत जास्त जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनाही (डब्ल्यूएचओ) सांगत आहे की, एकूण रुग्णांपैकी किमान ५% रुग्णांचे जीनाेम सिक्वेन्सिंग केले जावे. परंतु या आघाडीवर भारताची कामगिरी अत्यंत निकृष्ट राहिली आहे.

महामारीच्या १८ महिन्यांत देशात केवळ ६५ हजार नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले, जे एकूण रुग्णांच्या ०.१७३% आहे. परंतु आता सरकार दरमहा ९० हजार नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची तयारी आहे. जीनोम सिक्वेन्सिंग वाढवून नव्या रुग्णांत विषाणूचा व्हेरिएंट ओळखण्याचे प्रमाण वाढवले जाईल. मोठ्या संख्येने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पहिल्यांदा खासगी लॅबला परवानगी देण्याची तयारी आहे. यासाठी इंसाकोगला (आयएनएसएसीओजी) नियम व अटी निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. इंसाकोगने यासंदर्भात इच्छुक सर्वच लॅबकडून माहिती मागवली आहे.

खासगी लॅब नमुने घेणार नाही

  • बायोसेफ्टी लेव्हल-२ च्या खासगी लॅबनाच सिक्वेन्सिंगची परवानगी दिली जाईल.
  • खासगी लॅब नमुने घेणार नाहीत. सरकारी लॅब ते पाठवेल. रुग्णाचे नाव-पत्ता देणार नाही. सरकारी लॅबला वाटले तर खासगी लॅबला नमुन्यांमधून केवळ आरएनए वेगळे करून पाठवू शकेल.
  • खासगी लॅब सिक्वेन्सिंगचा निकाल थर्ड पाटीसोबत शेअर करू शकणार नाही.

व्हेरिएंंटची ओळख पटणार
सिक्वेन्सिंगद्वारे विषाणूतील बदल व लसीचा प्रभाव लक्षात येईल. ४ कोटींवर रुग्णसंख्येच्या अमेरिकेने सर्वाधिक ११.४३ लाख नमुन्यांचे सिक्वेन्सिंग केले. एकूण रुग्णांनुसार बघितले तर िब्रटनने एकूण रुग्णांच्या ११.९% सिक्वेन्सिंग केले आहे. जापानने ७.३%, कॅनडाने ६.९% तर जर्मनीने ४.८% रुग्णांचे सिक्वेन्सिंग केले आहे. डेन्मार्कने ४७%, न्यूझीलंडने ५८% रुग्णांचे सिक्वेन्सिंग केले आहे.

बातम्या आणखी आहेत...