आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या लाटेचे पहिले जीनोम सिक्वेन्सिंग:जीनोम स्टडीत फक्त 22 नमुने देणाऱ्या यूपीत डेल्टा व्हेरिएंटचा सर्वात जास्त 81.8% संसर्ग

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ... देशात 32% कोरोना संसर्गासाठी डेल्टा स्वरूप कारणीभूत

कोरोना संसर्ग घटत आहे. मात्र देशातील एकूण रुग्णांपैकी ३२% रुग्ण बी.१.६१७ स्ट्रेन व याच समूहाचे म्हणजे डेल्टा व्हेरिएंटचे (स्वरूप) आहेत. एखाद्या विषाणूतील बदलांचा माग हा जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे (जनुकीय अनुक्रम) काढला जातो. देशात २८ मेपर्यंत कोरोना विषाणूच्या २१,४७१ नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग झाले. लोकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशातून केवळ २२ नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग झाले. त्यात सर्वाधिक ८१.८% रुग्ण डेल्टा व्हेरिएंटने बाधित आढळले. संसर्गदरात गुजरात (७७.४%) दुसऱ्या, झारखंड (६७.२%) तिसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये महाराष्ट्र (४४०७) पहिल्या स्थानी आहे. तामिळनाडूत केवळ ५ नमुन्यांची तपासणी झाली. ९ राज्यांतून एकही नमुना घेतला नही. २८ मेपर्यंतच्या अहवालांनुसार उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगण व दिल्ली या राज्यांत बी.१.६१७ स्ट्रेन व या समूहातील इतर व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले. काही राज्यांत या स्ट्रेनचा दर ५० ते ८०% पर्यंत आहे. स्ट्रेन- बी १.१.७ अल्फा व्हेरिएंटमध्ये दीड महिन्यात घट झाली आहे.

देशात २.८९ कोटींवर रुग्ण, जीनोम स्टडी फक्त २९ हजारांचीच
डेल्टा व्हेरिएंटने युरोप, अमेरिकेसह अवघे जग त्रस्त आहे. कोरोना विषाणूचे हे स्वरूप इतक्या वेगाने पसरते की कोणत्याही भागात कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. वैज्ञानिकांनुसार, जीनोम सिक्वेन्सिंग करून या विषाणूने ग्रस्त भाग विलग करणे हाच बचावाचा उपाय आहे. मात्र देशात आजवर २.८० कोटींपेक्षा जास्त रुग्णांपैकी २९ हजारांचेच जीनोम सिक्वेन्सिंग झाले आहे. ज्या भागांत डेल्टाचे स्ट्रेन आढळतात तेथे राज्यांना तपासण्या वाढवणे व मायक्रो कंटेनमेंट झोन करून देखरेख करण्यास सांगितले जाते. या भागांतील पॉझिटिव्ह नमुन्यांच्या सलगपणे जीनोम सिक्वेन्सिंगचा सल्ला दिला जातो. मात्र असे घडत असल्याचे दिसत नाही.

अमेरिकेने जीनोम सिक्वेन्सिंग २०% वाढवले, डेल्टा व्हेरिएंट मिळालेल्या ठिकाणी लसीकरणाचा वेग दुप्पट
भारतासाठी डोकेदुखी ठरलेला कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेतही वेगाने फैलावत आहे. याचा परिणाम आणि जनुकीय अनुक्रमवर काम करणाऱ्या अमेरिकी संशोधकांनुसार, या व्हेरिएंटच्या पसरण्याचा दर आतापर्यंत मिळालेल्या व्हेरिएंटपेक्षा सर्वात वेगवान आहे. १ मे रोजी अमेरिकेत एकूण रुग्णांत १% या प्रकारचा विषाणू होता. मात्र, ३० दिवसांत देशात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये याची हिस्सेदारी ८-१०% पर्यंत पाहोचली आहे. अमेरिकेत ५० पैकी ४६ राज्यांत हा व्हेरिएंट पोहोचला आहे. अमेरिकेत मेमध्ये सरासरी दररोज २५ हजार रुग्ण समोर आले. यापैकी सुमारे ७५ हजार संसर्ग डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. या स्थितीमुळे आरोग्य तज्ज्ञांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यांच्यानुसार, हा व्हेरिएंट याच वेगाने पसरल्यास आगामी महिन्यांत स्थिती आणखी बिघडू शकते.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांत हा विषाणू प्रकार जास्त परिणामकारक झाल्यास, त्या-त्या भागांत लसीकरण मोहीम आणखी वेगवान करण्यास दबाव टाकू शकतो. अॅरिझोना कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये रोगप्रतिकारक जीवशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक दीप्त भट्टाचार्य म्हणाले, हा व्हेरिएंट वेगाने पसरण्यास मदत करणाऱ्या विशिष्ट बाबी त्यात आहेत. ही निश्चितच सर्वात मोठी चिंता आहे. भट्टाचार्य यांनी नुकतेच भारतात राहणाऱ्या दोन नातेवाइकांना गमावले आहे. लस या व्हेरिएंटवरही प्रभावी ठरेल,अशी त्यांना आशा आहे. टेक्सासच्या आरोग्य अधिकाऱ्यानुसार, येथील लसीकरणाचा वेग सरासरीपेक्षा मंद होता. डेल्टा व्हेरिएंट मिळाल्यानंतर आम्ही सतर्क झालो. आम्ही लसीकरण दुप्पट वेगाने वाढवले. याशिवाय जीनोम सिक्वेन्सिंगचे सॅम्पलही वाढवले आहेत. राष्ट्रीय स्तरावर जीनोम सिक्वेन्सिंग १-२% होत होती. त्यात २०% वाढ आहे. कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत.

अमेरिकेत १३०० पेक्षा जास्त सिक्वेन्समध्ये हा डेल्टा विषाणू आढळल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हा व्हेरिएंट ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या(बी.१.१.७) तुलनेत ६०-७० टक्के जास्त वेगाने पसरू शकतो. या विषाणूशी लढा देण्यासाठी प्रगत ट्रॅकिंग आणि विश्लेषणाची आवश्यकता आहे. सीडीसीशी संबंधित प्रयोगशाळा आणि इतर प्रयोगशाळांत संशोधन करणारे शास्त्रज्ञ भारतात आढळलेल्या नव्या बी.१.६१७ विषाणूची नेमकी भूमिका काय यावर संशोधन करत आहेत. हा व्हेरिएंट भविष्यात कोविड-१९ च्या नव्या स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो काय, याचा शोध घेतला जात आहे. संशोधनानुसार, हा सध्याच्या वा कमी गतीने पसरत राहिल्यास मोठा धोका होऊ शकतो. हा विषाणू आतापर्यंत ४४ देशांत मिळाला आहे.

या व्हेरिएंटवर अँटिबॉडी क्षमता सातपट कमी प्रभावी : इमोरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनात मूळ विषाणूसाठी तयार लस डेल्टा फॅमिलीच्या व्हेरिएंटवर कमी परिणामकारक होऊ शकते, असे आढळले आहे. लसीकरणानंतर विषाणू रोखणाऱ्या अँटिबॉडीची क्षमता मूळ विषाणूच्या तुलनेत या विषाणू प्रकारात सातपट कमी प्रभावी आहे. द.आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरिएंटमध्येही ही क्षमता चौपट कमी गृहीत धरली आहे. असे असतानाही लस या व्हेरिएंटवर चांगल्या पद्धतीने काम करेल, असे संशोधकांना वाटते.

सांधे आणि मांसपेशीच्या रुग्णांना फायझर-मॉडर्नाची लसीचा कमी लाभ : सांधे आणि मांसपेशीशी संबंधित रुग्णांवर फायझर आणि मॉडर्नाची लस कमी परिणामकारक ठरू शकते, असे संशोधकांना आपल्या संशोधनात आढळले आहे. मात्र, यावर आणखी अभ्यासाची आवश्यकताही व्यक्त केली आहे. संशोधकांनुसार, अशा रुग्णांना हे कळले पाहिजे की, लस घेतल्यानंतरही ते पूर्ण सुरक्षित नाहीत. याच्या सुरुवातीच्या निकालात कमकुवत रोगप्रतिकार प्रणालीच्या २० जणांना लस दिली, मात्र त्यांच्यात अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...