आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Genome Studies Of 20,000 People Of 100 Species In The Country Will Find Out Which Diseases Are At Risk

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:देशात 100 जातींच्या 20 हजार लोकांचा जिनोम अभ्यास, कोणत्या आजाराचा धोका आहे हे कळणार

जोधपूर / महावीर प्रसाद शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे फ्यूचर मेडिकल सायन्सवर वाढला फोकस, 20 संस्था सहभागी

कोरोनामुळे आरोग्य हा विषय जगभरात प्राधान्याचा झाला आहे. त्यामुळेच भारत सरकारही आता फ्यूचर मेडिकल सायन्सवर गांभीर्याने काम करत आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी जिनोम इंडिया प्रोजेक्टअंतर्गत देशातील १०० जाती-पोटजातींवर जिनोम स्टडी केली जात आहे. प्रकल्पाची जबाबदारी भारत विज्ञान संस्था आणि एम्स जोधपूरसह देशातील २० संस्थांना देण्यात आली आहे. कोणत्या जातीत कोणत्या आजाराची शक्यता जास्त आहे आणि त्यापासून कसे वाचू शकतो हे त्यातून जाणणे शक्य होईल. एखाद्या जातीत विशिष्ट आजाराची शक्यता असेल तर ती आधी रोखू शकाल. पर्सनलाइज्ड औषध चिप बनू शकेल.

अभ्यास : १९९३ मध्ये जिनोम मॅपिंग झाले , २००३ मध्ये निकाल आले
सर्वप्रथम १९९३ मध्ये जिनोम मॅपवर कन्सॉर्टियम झाले. जिनोम अभ्यास यशस्वीरीत्या करता आला. त्याचा निकाल २००३ मध्ये आला. तेव्हापासून आजारांचे त्वरित निदान होऊ लागले.

जाणून घ्या : निकालामुळे मेडिकल सायन्समध्ये कसा होईल बदल
- आजाराची माहिती आधी मिळेल.
- गर्भावस्थेतच उपचार होऊ शकेल.
- पर्सनलाइज्ड उपचार, म्हणजे कोणत्या व्यक्तीवर कोणते औषध, कोणत्या डोसचा परिणाम होईल.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जिनोमचा डेटा टाकल्यावर तो पूर्वानुमान सांगेल.
- औषधांचे कॉम्बिनेशन बदलेल. चिपही तयार होण्यास सुरुवात होईल.
- एखाद्या समुदायात विशिष्ट आजाराची जास्त शक्यता असल्यास ती रोखता येईल.
- अचूक माहितीमुळे चांगले उपचार होतील.

जिनोटाइप ४० जीबीपर्यंतचा
जीन मॅपिंग जटिल आणि नॅनो स्तराची असते. जीनचे कोडिंग व नॉन कोडिंग हे दोन भाग असतात. जिनोमच्या सिक्वेन्समुळे रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाची माहिती आधी मिळू शकते. एका व्यक्तीचा जिनोटाइप डेटा ४० जीबीपर्यंत असतो.

राजस्थान, यूपी, हरियाणात १० जातीचे सॅम्पलिंग, प्रकल्प पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील
एम्सचे डीन डॉ. कुलदीप सिंह यांनी सांगितले की, जानेवारीपासून सुरू झालेल्या अभ्यासात यूपी, राजस्थान व हरियाणाच्या काही भागांतून नमुने घेत आहेत. राजपूत, ब्राह्मण, अग्रवाल, जाट, माहेश्वरी, जैन, माळी, मुस्लिम, सिंधी, मीणा, गुर्जर आदी १० जातींच्या जीनचा अभ्यास केला जाईल. एम्सने विविध जिल्ह्यांतून ५०० व्यक्तींचे नमुने घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...