आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:‘मोदींच्या दुकाना’तून अडीच रुपयांत सॅनिटरी पॅड, स्वस्त औषधी घ्या; देशाचे 7500 वे जनऔषधी केंद्र राष्ट्राला समर्पित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील ७५०० वे जनऔषधी केंद्र राष्ट्राला समर्पित केले. मेघालयातील शिलॉँग येथील इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य तथा चिकित्सा विज्ञान संस्थेत हे केंद्र सुरू करण्यात आले. व्हिडिआे कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी मोदी म्हणाले, आैषधी महागडी आहे. त्यामुळे गरीबांसाठी ‘प्रधानमंत्री जनआैषधी योजना’ सुरू केली आहे. लोकांनी ‘मोदींच्या दुकानातून’ (लोक असे म्हणणे पसंत करतात) स्वस्त दरात आैषधी खरेदी करावी, असा माझा आग्रह आहे. या केंद्रांवर महिलांसाठी अडीच रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध आहे. ही योजना देशभरात चालवली जात आहे. ही योजना सेवा व रोजगाराचे माध्यम आहे.

या योजनेतून तरुणांना राेजगार मिळू लागला आहे. देशातील ७५०० जनआैषदी केंद्रांवर आयुषच्या आैषदीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वस्त आैषदी व चिकित्सा उपकरणांमुळे गरीब व गरजू लोकांचे वार्षिक ५० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. एक मार्चपासून जनआैषधी योजना जागरुकता सप्ताह सुरू झाला होता. त्याचा समारोप सात मार्च रोजी झाला. यानिमित्त ७५०० व्या केंद्राचे उदघाटन झाले.

बातम्या आणखी आहेत...