आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:आताच लस घेऊन टाका, 2 महिने पुरवठा मर्यादित, महिन्याला 9 कोटींची गरज, उत्पादन 7.5 कोटीच

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम दरमहा ६.५० कोटी, भारत बायोटेक १ कोटी डोसचे उत्पादन करते आहे

पवनकुमार | कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला असताना मंदावलेल्या लसीकरणाने चिंता वाढवली आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. आजवर १०.५५ कोटी लोकांना पहिला, १.४४ कोटी लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. अनेक राज्ये लसींचा पुरेसा साठा नसल्याची तक्रार करत आहेत. सध्या सरासरी ३० लाख डोस टोचले जात आहेत. यामुळे दरमहा ९ कोटी डोसची गरज आहे. देशातील लस उत्पादक दोन्ही कंपन्या २ महिन्यांत सरासरी ७.५० कोटी डोस उत्पादित करतील. यामुळे जे पात्र आहेत त्यांनी लसीकरण करून घेतले पाहिजे. आरोग्यतज्ज्ञ लसींची उपयुक्तता वारंवार सांगत आहेत. अनेक राज्यांनी लसींच्या तुटवड्यासोबतच सर्वसामान्यांसाठी ४५ वर्षांची वयोमर्यादा हटवण्याची मागणी केली आहे. लसीची उपलब्धता हेच सध्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.

नुकतेच केंद्रीय अधिकारी व तज्ज्ञांच्या टीमने सीरमसह भारत बायोटेकच्या प्रकल्पांना भेट दिली. ५ महिन्यांपर्यंत कोणती कंपनी किती डोस तयार करेल ही माहिती टीमने केंद्राला दिली. केंद्राने यासाठी आर्थिक मदत देण्यास संमती दर्शवली. इतर लसींसाठी वापरलेले सिलिंडर कोरोना लसीसाठीही वापरू, असे कंपन्या म्हणत आहेत. यासाठी यंत्रणेत बदल केला जात आहे. भारत सरकारने धोरणात बदल करून स्पष्ट केले आहे की, यूएसएफडीए, युरोपियन मेडिसन एजन्सी, यूके मेडिसन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सी व जपानच्या फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइस एजन्सीद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही लसीला भारतातील नियामक आपत्कालीन वापरासासाठी परवाना देऊ शकतात. सरकारच्या या धोरणानंतर लवकरच भारतात इतर कंपन्यांच्याही लसी उपलब्ध होण्याची आशा आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायझेशननुसार, ६ महिन्यांत रशियन लस स्पुतनिक-व्हीचे १० कोटी डोस मिळण्याचा अंदाज आहे. त्याची सुरुवात मेपासून होईल. मात्र कोणत्या महिन्यात किती डोस येतील, हे अद्याप निश्चित नाही. भारताने आतापर्यंत ६.८५ कोटी डोस जगातील ८५ देशांना दिले आहेत.

सप्टेंबरपर्यंत कोव्हॅक्सिनचे १० कोटी डोस
केंद्र सरकार भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहे. सध्या दरमहा १ कोटी डोस तयार होत आहेत. ते जुलै-अॉगस्टपर्यंत ७-७ कोटी आणि सप्टेंबरपर्यंत १० कोटींवर नेण्याची तयारी आहे. देशात सहा कंपन्यांच्या लसी सध्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजची ट्रायल करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...