आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाझियाबादमधील असोटेक नेक्स्ट सोसायटीच्या लिफ्टमध्ये तीन मुली सुमारे 24 मिनिटे अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्ट ही 20व्या मजल्यावरून खाली येत होती. तेव्हा अचानक 11व्या मजल्यावर अडकली. लिफ्टमध्ये अडकलेल्या तिन्ही मुली ओरडत आणि रडत होत्या. यावेली मुलींना स्वतःहूनही लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न फसले. अखेर 24 मिनिटांनी लिफ्ट मॅन्युअली उघडून मुलींना बाहेर काढण्यात आले आहे.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. क्रीडा साहित्य व्यावसायिक शिवम गेहलोत येथे 20 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांची 8 वर्षांची मुलगी तेजस्विनी तिसरीत शिक्षण घेते. तेजस्विनी तिच्या मैत्रिणी मिशिका आणि वैद्य यांच्यासोबत सोसायटी पार्कमध्ये खेळण्यासाठी जात होती. यावेळी तिन्ही मुली 20 व्या मजल्यावरून लिफ्टमध्ये चढल्या. लिफ्ट अचानक 11व्या मजल्यावर अडकली. मुलींना ना गेट उघडता येत होते ना खाली उतरता येत होते. यामुळे त्या घाबरल्या होत्या.
हात जोडून देवाला पार्थना
तिन्ही मुलींनी हाताने लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मुलींनी लिफ्ट उघडण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. तर दोन मुली हात जोडून देवाला प्रार्थना करताना दिसून आल्या. इमारतीमधील इतर रहिवाशांना लिफ्टची आवश्यकता भासली. तेव्हा 11 व्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याचे कळाले. यानंतर देखभाल पथकाने घटनास्थळी येऊन लिफ्ट उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे 24 मिनिटांनी लिफ्ट मॅन्युअली उघडून तिन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले.
भीतीचे वातावरण
क्रीडासाहित्य व्यावसायिक शिवम गेहलोत यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळताच मी सोसायटीत पोहोचलो. तिन्ही मुली खूप घाबरल्या होत्या. ती सतत रडत होती. या घटनेनंतर मुली एकदाही लिफ्टमध्ये गेल्या नाहीत. इतर मुलेही लिफ्टमध्ये जाताना घाबरत आहते.
रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा दाखल
शिवमने बुधवारी रात्री उशिरा रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन (RWA) च्या अध्यक्षा चित्रा चतुर्वेदी आणि सचिव अभय झा यांच्या विरोधात पोलिस स्टेशन क्रॉसिंग रिपब्लिकमध्ये एफआयआर दाखल केला. लिफ्ट देखभालीच्या नावाखाली दरवर्षी सुमारे 25 लाख रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप आहे. असे असतानाही अशा तक्रारी रोज समोर येत आहेत. रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी करूनही लिफ्टचा प्रश्न सुटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.