आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ghaziabad Dog Attack CCTV Video Footage | Charms Castle Raj Nagar Extension | Marathi News

लिफ्टमध्ये मुलाला चावला कुत्रा:वेदनेने ओरडत होता मुलगा, शांतपणे उभी होती महिला; CCTV फुटेज आले समोर

गाझियाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबादमध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने एका मुलाला चावा घेतला. मुलगा लिफ्टमध्ये रडत होता, वेदनेने ओरडत होता, पण कुत्र्याची मालकिन शांतपणे हे सर्वकाही पाहत उभी होती. राजनगर एक्स्टेंशनमधील या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पाळीव कुत्र्यांना लिफ्टमध्ये नेणे बंद करावे, असे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले.

राजनगर एक्स्टेंशनच्या चार्म्स कॅसल सोसायटीच्या लिफ्टमध्ये सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. 9 वर्षांचा मुलगा चौथीत शिकतो. ट्यूशन करून तो घरी परतला होता. लिफ्टमधून फ्लॅटकडे जात असताना एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन लिफ्टमध्ये शिरली. कुत्र्यापासून वाचण्यासाठी मुलगा लिफ्टमध्ये गेटच्या दिशेने येत असताना कुत्र्याने त्याच्या मांडीवर चावा घेतला.

कुत्र्याने पुन्हा चावण्याचा प्रयत्न केला
कुत्रा चावल्याने मुलाला तीव्र वेदना होत होत्या, तो पाय जमिनीवर ठेवू शकत नव्हता. यादरम्यान महिला शांतपणे पाहत उभी होती. तिने मुलाशी बोलण्याचा किंवा त्याला समजावून सांगण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. महिला तिच्या मजल्यावरच्या लिफ्टमधून बाहेर येताच कुत्र्याने पुन्हा एकदा मुलाला चावण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी मुलगा वाचला.

मुलाची आई जयंकरा राव यांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राव म्हणाल्या, "मी तळमजल्यावर उभी होती, तेव्हा मुलगा आला आणि मला त्याने संपूर्ण घटना सांगितली. त्यावेळी महिला तिच्या कुत्र्याला बेसमेंटमध्ये घेऊन जात होती.

तिला काय घडले विचारले असता महिलेने तिचे नाव सांगितले नाही आणि फ्लॅट नंबरही दिला नाही. नंतर सुरक्षा रक्षकाकडून समजले की ही महिला बी-506 चार्म्स कॅसलमध्ये राहते.

एक्शन घेतल्यास पाळीव प्राणी प्रेमी संतप्त होतात
रहिवासी रुपेश वर्मा म्हणाले, "सोसायटीची अवस्था अत्यंत वाईट आहे. सोसायटीत कुत्र्यावर कोणी कारवाई केली तर काही बुद्धिजीवी लोक कुत्र्याला वाचवण्याच्या नावाखाली कायदा सांगू लागतात. कुत्र्याला मारण्याचे व्हिडिओ बनवतात आणि एफआयआर दाखल करतात. अशा लोकांना माणसांपेक्षा कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे."

सोशल मीडियावरही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या
तहसीन गनी यांनी ट्विटरवर लिहिले की, "ऑफिसर सिटीमध्येही परिस्थिती वाईट आहे. ते कुत्र्यांचे प्रजनन ठिकाण बनले आहे. लोकांना त्यातून सुटका हवी नाही. दर 15 व्या दिवशी कुत्रा एका मुलाला चावतो, लोक अजूनही झोपलेले आहेत."

या घटनेबाबत राजनगर एक्स्टेंशन नावाच्या एका ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "कुत्रा, बैल, गाढव, सिंह, चित्ता, हत्ती ज्यांना पाळायचा असेल त्यांनी खुशाल पाळावे परंतु त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असेल तर कृपया हे थांबवा. लोकांनी त्यांच्या सोयीसाठी फ्लॅट घेतले आहेत, काही लोकांच्या पशुप्रेमासाठी नाही."

बातम्या आणखी आहेत...