आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REEL बनवताना पती-पत्नीसह तिघांना रेल्वेने उडवले:रात्री रेल्वे रुळांवर बनवत होते व्हिडिओ; 7 महिन्यांपूर्वी केले होते लव्ह मॅरेज

गाझियाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे रील्स बनवण्याच्या नादात पद्मावत एक्सप्रेसखाली चिरडून पती-पत्नीसह 3 जणांचा करुण अंत झाला आहे. हे तिघेही ट्रॅकच्या मध्यभागी उभे राहून रील्स तयार करत होते. त्यात ते एवढे रममाण झाले होते की, त्यांना रेल्वेचा हेडलाइट व तिचा हॉर्नही ऐकू आला नाही.

मसूरी भागात ही घटना घडली आहे. अपघात एवढा भयावह होता की, तिघांच्याही मृतदेहाचे अनेक तुकडे झाले. ते रुळावर जवळपास 100 मीटरपर्यंत अस्ताव्यस्त पडले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना हे तुकडे गोळा करण्यासाठी अर्धा तास लागला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

या दुर्दैवी अपघातात तिन्ही मृतदेहांचे अनेक तुकडे झाले.
या दुर्दैवी अपघातात तिन्ही मृतदेहांचे अनेक तुकडे झाले.

इन्स्पेकटर आर सी पंत यांनी सांगितले की, "बुधवारी रात्री 9 च्या सुमारास कल्लूगडी फाटक व डासना स्थानकादरम्यान ही घटना घडली. ताशी 80 किमी वेगाने धावणारी पद्मावत एक्सप्रेस गाझियाबादहून मुरादाबादकडे जात होती. रेल्वेच्या लोको पायलटच्या माहितीनुसार, 2 तरुण व एक तरुणी रेल्वे रुळावर उभे होते. त्यांच्या मोबाइलचा फ्लॅश लाइट सुरु होता. त्यात ते व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसून येत होते. पायलटने त्यांना सावध करण्यासाठी अनेकदा हॉर्न वाजवला. पण त्यांना ऐकू आला नाही. त्यानंतरही तिघेरी रेल्वेखाली चिरडले गेले."

तिघेही मसुरीचे होते

इन्स्पेक्टर आर सी पंत यांनी सांगितले की, लोको पायलटने पोलिसांना पाठवलेल्या मेमोमध्ये ही घटना व्हिडिओ करण्याच्या नादात घडल्याचे सांगितले आहे.
इन्स्पेक्टर आर सी पंत यांनी सांगितले की, लोको पायलटने पोलिसांना पाठवलेल्या मेमोमध्ये ही घटना व्हिडिओ करण्याच्या नादात घडल्याचे सांगितले आहे.

इन्स्पेकटरने सांगितले," घटनास्थळी एका व्यक्तीचा मोबाइल आढळला आहे. मोबाइलचा डिस्प्ले फुटला आहे. पण तो सुरू आहे. पोलिस त्याची न्यायवैद्यक तपासणी करणार आहेत." या अपघाताची माहिती मिळताच पीडित कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत्तांत नदीम, त्याची पत्नी झैनब व मित्र शकील यांचा समावेश असल्याचे सांगितले आहे. तिघेही मसुरीचे राहणारे आहेत. नदीम व शकील टॅक्सी चालक होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोको पायलटने पोलिसांना एक मेमो पाठवला आहे. त्यात व्हिडिओ तयार करण्याच्या नादात हे तिघेही रेल्वेखाली आल्याचे सांगितले आहे.

स्टेशन मास्तरने पोलिसांना दिली माहिती

हे छायाचित्र DCP (ग्रामीण) ईरज राजा यांचे आहे. त्यांनी सांगितले की, रात्री 9 च्या सुमारास स्टेशन मास्तरने या घटनेची माहिती दिली.
हे छायाचित्र DCP (ग्रामीण) ईरज राजा यांचे आहे. त्यांनी सांगितले की, रात्री 9 च्या सुमारास स्टेशन मास्तरने या घटनेची माहिती दिली.

DCP (ग्रामीण) ईरज राजा यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशन मास्तरांनी मसुरी ठाण्याला ही माहिती दिली. त्यात त्यांनी रेल्वेखाली आल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. चौकशीत घटनास्थळी पती-पत्नी व अन्य एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत झाला होता."

नदीम-झैनबचा 7 महिन्यांपूर्वी झाले होते लव्ह मॅरेज

ACP आकाश पटेल यांनी सांगितले, "नदीम व झैनब मूळचे मेरठच्या दिसौरा गावचे आहेत. 7 महिन्यांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ते गाझियाबादच्या कस्बा मसुरीत राहत होते. येते नदीम आपला मित्र शकीलसोबत टॅक्सी चालवत होता. नदीम, झैनब व शकील बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घराबाहेर पडले होते."

ते म्हणाले, "पोलिस आता या तिघांनी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत काय-काय केले याचा शोध घेत आहेत. याशिवाय हे प्रकरण आत्महत्येचे आहे काय याचाही धुंडाळा घेत आहेत."

बातम्या आणखी आहेत...