आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडाने पिस्तूल दाखवून पळवली सोनसाखळी, VIDEO:जवळ उभ्या असलेल्या तरुणाचा मोबाइल घेऊनही पळाला, गाझियाबादची घटना

गाझियाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंड पिस्तूल दाखवून महिलेची सोनसाखळी व मोबाइल हिसकावून पळून गेला. 

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील आपल्या घराबाहेर उन्हात बसलेल्या एका महिलेची सोनसाखळी गुंडांनी दिवसाढवळ्या हिसकावून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीट कैद झाली आहे. फुटेजमध्ये गुन्हेगार या महिलेला पिस्तूल दाथव असल्याचे दिसून येते आहे. हे पिस्तूल पाहून महिला घाबरून आपले दागिने त्याच्या स्वाधिन करते. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळीही त्याला देते. गुन्हेगार एवढ्यावरच थांबत नाही, तो तिच्या हातातील मोबाइलही हिसकावून पळून जातो.

लोनीच्या डीएलएफ अंकुर विहार कॉलनीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पीडित महिलेचे नाव गीता आहे. त्या दुपारी आपल्या घराबाहेरील अंगणात उन्हात बसल्या होत्या. त्यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. अचानक दुचाकीवरून दोन गुंड तिथे पोहोचले. त्यांच्यापैकी एकाने गीता यांच्यावर पिस्तूल रोखले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे महिला घाबरली. त्यानंतर गुंडाने महिलेची सोनसाखळी व मोबाइल हिसकावून पोबारा केला.

जवळून जाणाऱ्या तरुणाचाही फोन हिसकावण्याचा प्रयत्न

यावेळी गुंडांनी तेथून जाणाऱ्या एका तरुणाच्या हातातील मोबाइलही हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणाने आपला हात मागे ओढल्याने तो वाचला. या घटनेमुळे भयभीत झालेली महिला या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाही. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाची तिसऱ्या मजल्यावरून उडी

गाझियाबादच्या लोनीमध्येच अन्य एक घटना उजेडात आली आहे. येथील ट्रॉनिका सिटी क्षेत्रात 3 मजली फॅक्ट्रीच्या छतावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात हा तरुण छतावर उभे राहून काहीतरी बोलताना दिसून येत आहे. तर खाली उभे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला वाचवण्यासाठी ते पोते अंथरण्याचा प्रयत्न करत असतानाच तो खाली उडी मारतो. त्यानंतर गंभीर अस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

तरुणाने तिसऱ्या मजल्यावर चढून उडी मारली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
तरुणाने तिसऱ्या मजल्यावर चढून उडी मारली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

या तरुणाचे नाव त्रिलोकी आहे. तो मूळचा हर्दोईचा आहे. दिल्लीच्या शकरपूर स्थित आपल्या मावशाकडे तो राहतो. त्याने 3 मोबाइची चोरी केली होती. त्यानंतर काका हरवीर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून कुटुंबाचे सदस्य त्याचा शोध घेत होते. दिल्ली पोलिसही त्रिलोकीचा शोध घेत होते. पोलिसांनी सर्वांचे फोन ट्रेसिंगवरही टाकले होते.

हे तीन मजली फॅक्ट्रीचे छायाचित्र आहे. याच इमारतीवरून तरुणाने उडी मारली.
हे तीन मजली फॅक्ट्रीचे छायाचित्र आहे. याच इमारतीवरून तरुणाने उडी मारली.
बातम्या आणखी आहेत...