आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ghazipur Girl Found In Ganga Latest Updates। New Born Girl Found Floating In Wooden Box In The Ganga In Ghazipur Uttar Pradesh

चिमुकलीला मिळाले दुसरे जीवन:मच्छिमाराला गंगेच्या किनारी मिळाला लाकडी बॉक्स, त्यात होती कपड्यात गुंडाळलेली चिमुकली

गाजीपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये मंगळवारी गंगा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका मच्छीमाराला पाण्यात तरंणारा एक लाकडी बॉक्स सापडला. त्याने बॉक्स उघडल्यावर, त्याला त्यात एक नवजात मुलगी दिसली. बॉक्समध्ये जन्म पत्रिका आणि दुर्गा मातेसह अनेक देवांचे फोटोही लावलेले होते. पोलिसांनी त्या मुलीला आशा ज्योती केंद्रात नेले असून, त्या मुलीची तब्येत पूर्णपणे ठीक आहे.

प्रकरण सदर कोतवाली क्षेत्रातील ददरी घाटाचे आहे. येथील रहिवासी गुल्लू चौधरी मल्लाहने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सायंकाळी त्यांना नदीकिनारी एक लाकडाचा बॉक्स मिळाला. त्या बॉक्समधून रडण्याचा आवाज येत होता. आवाज ऐकून काही लोकही जमा झाले. त्यांनी तो बॉक्स उघडल्यास त्यांना त्यात कपड्यात गुंडाळलेली एक चिमुकली आढळली.

बॉक्समध्ये जन्मपत्रिका
त्या बॉक्समध्ये एक जन्म पत्रिकाही आढळली. त्यात त्या चिमुकलीचे नाव गंगा लिहीलेले आहे आणि तिचा जन्म 25 मे रोजीचा लिहीलेला आहे. म्हणजे, त्या चिमुकलीचे वय फक्त तीन आठवड्यांचे आहे.

बातम्या आणखी आहेत...